आपला जिल्हाक्राईम स्टोरी

शिकारी टोळीतील १३ आरोपींना २७ जुलै पर्यंत वनकोठडी

१६ लोकांच्या टोळीला रविवारी वनविभागाच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील संयुक्त चमू ने गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी येथे मध्यरात्री छापा टाकून घेतले होते ताब्यात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२४ जुलै 

वाघासह अन्य वन्यजीवांची शिकार करणारी बहेलिया समुदायातील १६ लोकांच्या टोळीला रविवारी वनविभागाच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील संयुक्त चमू ने गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी येथे मध्यरात्री संशयितांच्या ठिकाणी छापा टाकून ताब्यात घेतले होते. त्याठिकाणी वाघाची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे शिकंजे ६ नग, इतर धारदार शस्त्रे, वाघाची ३ नखे व रोख ४६ हजार रुपये जप्त करण्यात आले. सोमवारी यातील १३ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २७ जुलै पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

गुवाहाटी येथे आसाम वनविभाग व पोलीस विभागाच्या पहिल्या संयुक्त कारवाईत हरियाणा राज्यातील ३ व्यक्तींना अटक करण्यात आली होती, त्यांचे कडून वाघाची कातडी व हाडे सुद्धा जप्त करण्यात आली होती. तिन्ही आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती तपासात घेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील सर्व व्याघ्रप्रकल्प सभोवताल वाघांची शिकार होत असल्याच्या सूचना २९ जून ला देण्यात आल्या होत्या.

त्या ३ आरोपीनी चंद्रपूर व गडचिरोली या भागात वाघाची शिकार केली काय? याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी चंद्रपूर क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यांनी तीन सदस्यीय पथक गुवाहाटी येथे पाठविले. आरोपी जवळून शिकारी बाबत माहिती घेतली असता गडचिरोली येथे टोळीमधील काही सदस्य वाघाच्या शिकारी साठी वावरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या टोळीमधील सदस्यांवर मेळघाट व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्त व पोलिसांच्या संयुक्त पथकाने संशयितावर पाळत ठेवली आणि रविवारी छापा टाकून अटक केली.
अटक करण्यात आलेल्या मध्ये ६ पुरुष, ५ स्त्रिया व २ मुलांचा समावेश आहे.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे.सदर प्रकरणाच्या पुढील तपासासाठी गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांना नियुक्त करण्यात आले आहे. टोळीतील आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!