आपला जिल्हा

आठ लाख ईनामी दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीसांचे यश

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२४ जुलै 

२८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांच्या शहिद सप्ताह सुरू होण्यापूर्वीच ८ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून आणन्यात गडचिरोली पोलीस दलाने यश मिळवले आहे. अडमा जोगा मडावी, वय २६ वर्ष रा. जिलोरगडा, पो. पामेड तह. ऊसुर, जि. बिजापूर (छ.ग.) व टुगे कारु वड्डे, वय ३५ वर्ष रा. कवंडे, पो. बेद्रे, तह. बैरामगड, जि. बिजापूर (छ.ग.) असे या दोन जहाल नक्षलवाद्यांचे नाव आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

अडमा जोगा मडावी हा जुलै २०१४ ला पामेड एलजीएसमध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०२१ पर्यंत कार्यरत होता. जानेवारी २०२१ ला झोन एक्शन टीममध्ये बदली होवून कार्यरत राहून जुन २०२३ दलम सोडुन घरी परत आला. या कार्यकाळात त्याचेवर ८ चकमकी, ५खुन, व इतर ३ गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. टुगे कारु वड्डे हा २०१२ ला जाटपूर दलम जनमिलीशीय सदस्य पदावर भरती होऊन सन २०२३ पर्यंत कार्यरत राहुन घरी परत आला होता. या कार्यकाळात त्याचेवर ६ खुन व एका जाळपोळीत समावेश असल्याचे आरोप आहेत. महाराष्ट्र शासनाने अडमा जोगा मडावी याचेवर ६ लाख रूपयांचे तर टुगे कारु वड्डे याचेवर २ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

मागिल वर्षभरात १२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी केले आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!