विशेष वृतान्त

जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाने मृत्यू प्रकरणी संस्था सचिव विश्वजीत कोवासेंना अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला होता अटकपूर्व जामीन अर्ज, संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे अजूनही फरार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर 

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रम शाळेत १० ऑगस्टच्या रात्री सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली असून कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीचे सचिव तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड. विश्वजीत कोवासे यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. तर संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे अद्यापही फरार आहेत. विश्वजीत यांना शनिवारी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात पेश करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेनंतर शाळेचे अधीक्षक, अधीक्षिका आणि मुख्याध्यापकासह संस्था अध्यक्ष आणि सचिवावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापूर्वी तिघांना अटक झाली असून संस्था अध्यक्ष आणि सचिव असलेले कोवासे पिता-पुत्र फरार होते. दोघांनीही गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालय तसेच नागपूरच्या उच्च न्यायालयात अटकपूर्वक जमीनासाठी अर्ज केला होता. मात्र दोन्ही न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. आता संस्था सचिव विश्वजीत कोवासे यांना अटक करण्यात आली आहे. विश्वजीत यांना शुक्रवारी अटक केल्यानंतर ते अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांना गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात हाजर करण्यात आले.तेथे दोन दिवसांचा पीसीआर मिळाल्याने त्यांना धानोरा पोलीस रिमांड मध्ये ठेवण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!