नवेगाव ग्रामपंचायतीमधील रहिवासी क्षेत्रात कचऱ्याच्या डंपिंग यार्डला नागरिकांचा तीव्र विरोध
दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात ; जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन केली हटविण्याची मागणी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१२ सप्टेंबर
गडचिरोली शहराला लागून असलेल्या नवेगाव ग्रामपंचायत मधील वार्ड नंबर-३ , एमआयडीसी पोलीस सार्वजनिक मैदानालगत असलेले शासकिय बोडीजवळील कच-याचे डम्पिंग यार्ड आणि प्लॅस्टिक विलगीकरण केंद्र हे प्रदुषणाचे आगार बनले असून त्यातून सुटलेल्या दुर्गंधी मूळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सदरकच-याचे डम्पिंग यार्ड आणि प्लॅस्टिक विलगीकरण केंद्र हटवून शहरातील राहत्या वस्तीपासुन लांब अतंरावर स्थानांतरीत करण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

गडचिरोली शहरालगत असलेल्या नवेगाव ग्रामपंचायत अंर्तगत येत असलेल्या वैनगंगा नगर मधील भुमापन क्रमांक ४६ /९/२/३/ ४/५/६ सर्वे नंबर ५१/१ प्लॉट क्रमांक ४,५,६,७,८,९ आणि त्या संपुर्ण भागात इतरही ले-आऊट असुन सदर लेआऊट वर मोठया प्रमाणात वस्ती निर्माण झालेली आहे. व नविन घरबांधकामे सुरू असुन वस्ती वाढत आहे या संपुर्ण वस्ती ला लगत नवेगाव ग्रामपंचायतची बोडी असुन या बोडीमध्ये ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापनाचे डम्पिंग यार्ड व प्लॅस्टिक विलगीकरण केंद्र बनविले आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करता कचरा व्यवस्थापनाचे डम्पिंग यार्ड हे ठिकाण नागरी वस्तीपासुन दुर असणे अपेक्षित आहे. वस्तीनजीक असलेल्या बोडीमध्ये ग्रामपंचायतीचा जेव्हा कचरा जाळला जातो त्यामध्ये मोठया प्रमाणात प्लास्टिक कच-याचा दुर्गंध वस्तीत पसरू लागला आहे जेव्हा कचरा जाळला जातो त्यामध्ये मोठया प्रमाणात प्लास्टिक असते या प्लास्टिकचा धुर व दुर्गंध वस्तीत येऊ लागला आहे. परिणामी येथील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन भविष्यात येथील नागरीकांना अनेक आजारांचा सामना करावा लागणार आहे.
शिवाय या दुर्गंधीमुळे वस्तीत राहणे कठीण झाले आहे. भविष्यात याची व्याप्ती वाढल्यास निवासी वस्तीत आरोग्याची मोठी समस्या निर्माण होईल त्यामुळे यावर वेळीच उपाय योजना करणे आवश्यक आहे. या डंम्पिंग यार्ड ला लागुनच सरकारी पोलीस मैदान असुन सकाळ -संध्याकाळ येथे युवा युवती पोलीस भरतीची तयारी करणे करीता, जेष्ठ नागरीक शुद्ध हवा घेणेसाठी येत असतात तसेच लहान मुले फिरायला येत असतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच रस्त्यावरील साचलेल्या कचऱ्यामुळे भटक्या गुरांचा व कुत्र्यांचा हैदोस वाढलेला आहे व सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तसेच कच-याची विल्हेवाट लावत असतांना त्यातुन निघणाऱ्या आगीच्या धुरामुळे वस्तीत श्वसनाचे त्रास वाढत चाललेले आहे. वातावरणात हानिकारक वायु, धुर आणि इतर कण मिसळुन विपरीत परिणाम होत आहे. कॅन्सर, मलेरीया, डेंगु, काविळ, टायफाईड, फुफुसाचे गंभीर साथीचे आजार होऊन परिसरातील नागरीकांची जिवित हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. कचरा व्यवस्थापन हे सरकारच्या सर्व क्षेत्रांध्ये एक समवर्ती कार्य आहे, नवेगाव ग्रामपंचायत अंर्तगत एमआयडीसी नवेगाव परिसरात लोकांची वस्ती अनेक वर्षापासुन असुन तसेच लागुनच नविन घरांची बांधकामे सुरू असुन वस्ती वाढत आहे. कच-याचे डंम्पिंग यार्ड नागरी वस्तीत उभारण्यात येऊ नये, असे शासनाचे धोरण असतांना आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केल्या नंतरही या ठिकाणी डम्पिंग यार्ड उभारण्यात आले. त्यामुळे हे चुकिच्या ठिकाणी उभारण्यात आलेले डंपिंग यार्ड ताबडतोब बंद करावे आणि येथील कचरा रहिवासी वस्तीचे बाहेर हलविण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हे डंपिंग यार्ड तात्काळ बंद करून हलविले नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


