गो मलेरिया गो – गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याचा प्रशासनाने केला खो
गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भर पावसात थाळी बजाओ, ताली बजाओ आंदोलन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ८ जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रशासन व शासन यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, आता पर्यंत जिल्ह्यात अडीच हजाराहून अधिक मलेरियाचे रुग्ण आढळले तर मागील चार दिवसात १० नागरिकांना अपुऱ्या आरोग्यवस्थेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे, शासन यावर उपाययोजना करण्यास अकार्यक्षम आहे. आरोग्य प्रशासनाच्या या अकार्यक्षमता आणि निष्क्रीयतेविरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे नेतृत्वात आज मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर भर पावसात ‘गो मलेरिया गो – गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याचा प्रशासनाने केला खो’ म्हणत थाळी वाजवत आंदोलन केले व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिले .
जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक पद रिक्त आहेत अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र येथे आरोग्य सेविका व कर्मचारी उपलब्ध नाही, अजूनही अनेक गावामध्ये औषधी साठा, गोळ्यांचा पुरवठा झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यामध्ये गढ़चिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा निष्क्रिय कारभार पुढे येते अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गममावा लागते तरी परंतु शासन आणि प्रशासन या कड़े जानीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा काम सात्यत्याने करतात म्हणून यावर तात्काळ उपाय योजना करावे, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक उप जिल्हा रुग्णालयामध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव आहे कोरोना काळात अनेक उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट लावण्याकरीता टेंडर काढण्यात आले मात्र काम पूर्ण न झाल्याने अनेक प्लांट धूळ खात आहेत त्यांची सुद्धा तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, व सर्व उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावे तसेच रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. विश्वजीत कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदुजी वाईलकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हा महासचिव घनश्याम वाढई, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप घोडाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, प्रतिक बारसिंगे, हेमंत मोहितकर, चरुदत्त पोहाणे, स्वप्नील बेहरे, सुभाष धाईत, सुधीर बांबोळे, मजीद सय्यद, नीलकंठ पेंदाम, काशिनाथ गावतुरे, सुधीर बांबोळे, अनिल तुमराम, दिलीप चूधरी, दीपक चौधरी, यादव गेडाम, उत्तम ठाकरे, निखिल पुण्यप्रेडिवार, मिलिंद बारसागडे, राजूभाई सामृतवार, विजय पोवनकार, हेमराज प्रधान, अशोक संदीप, संदीप उईके, अंकुश रामटेके, शामराव बाबनवाडे, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने, गौरव येणप्रेडीवार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, सौ. सुनीता रायपूरे, सौ. कविता उराडे, सौ. रिता गोवर्धन, सौ. शालिनी पेंदाम यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.