आपला जिल्हा

एलएमईएल ला आयबीएम कडून ५ – स्टार रेटिंग

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी.किशन रेड्डी यांनी एलएमईएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ५ - स्टार रेटिंगचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ९ जुलै 

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)च्या सुरजागड लोहखनिज खाणीने केंद्रीय खाण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (आयबीएम) कडून प्रतिष्ठित ५ -स्टार रेटिंग मिळवून गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. ७ जुलै रोजी जयपूर येथील राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्रात झालेल्या समारंभात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी.किशन रेड्डी यांनी एलएमईएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ५ – स्टार रेटिंगचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले.

२०२३-२४ या वर्षात खाणकामातील उत्कृष्टता आणि हरित नवोपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुरजागड खाणीला हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे, भारतीय खाण ब्युरोचे प्रभारी महानियंत्रक पीयुष नारायण शर्मा, आयबीएमचे मुख्य खाण नियंत्रक पंकज कुलश्रेष्ठ प्रामुख्याने उपस्थित होते.

केंद्रीय खाण मंत्रालयाने शाश्वत विकास मार्गदर्शक तत्त्व (एसडीएफ) लागू करण्यासाठी खाणींच्या स्टार रेटिंगची एक प्रणाली विकसित केली आहे. सर्व मॉड्युलमध्ये ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या खाणीला प्रतिष्ठित पंचतारांकित रेटिंग दिले जाते.५ – स्टार रेटिंगमुळे सुरजागड  लोहखाण एसडीएफ अंतर्गत शाश्वत आणि पर्यावरणपूरक खाणकामाचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे.

सदर उपलब्धीबाबत आनंद व्यक्त करताना, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन म्हणाले की, स्थानिक समुदायाचा पाठिंबा आणि एलएमईएल चमूच्या कटीबद्धतेमुळेच हे यश मिळविणे शक्य झाले आहे. खाण मंत्रालयाने विकसित केलेल्या एसडीएफअंतर्गत प्रतिष्ठित पंचतारांकित रेटिंग मिळणे ही एलएमईएल आणि गडचिरोलीच्या लोकांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटकांवर प्रतिकूल परिणाम न करता समावेशक विकासाप्रतीची आमची वचनबद्धता या उपलब्धीतून प्रतिबिंबित होते. गडचिरोली जिल्ह्यात हरित पोलाद निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिक उत्साहाने काम करण्याची ऊर्जा आम्हाला ५ – स्टार रेटिंगमुळे मिळाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून वार्षिक १० दशलक्ष टन क्षमतेच्या सुरजागड लोहखनिज खाणीत पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणारी जड उपकरणे, एलएनजी वाहने आणि जगातील पहिल्या इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर एक्स्कॅव्हेटर- माउंटेड ड्रिलसह विद्युतचलित ड्रीलच्या वापरावर भर देण्यात आला आहे. हवा, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वोत्तम पर्यावरणीय शाश्वतता पद्धतींचे एलएमईएल पालन करते.

एलएमईएलचा सकारात्मक परिणाम खाणकामापलीकडे सामाजिक-आर्थिक परिवर्तनाच्या क्षेत्रात दिसत आहे. हेडरी येथील सीबीएसई संलग्नित लॉयड्स राजविद्या निकेतन शाळा, लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमधील आधुनिक आरोग्य सुविधा, स्थानिक महिलांनी चालवलेले ‘वन्या’ कपडे उत्पादन युनिट, वाहनचालक प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रशिक्षण सुविधा, कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण इत्यादी विविध उपक्रमांद्वारे आदिवासी समुदायांमध्ये सामाजिक-आर्थिक पुनर्जागरणाला चालना देण्याचे काम एलएमईएल कडून केले जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!