विशेष वृतान्त

मनरेगा बचाओ संग्राम अंतर्गत कांग्रेसचे शिवणी येथे निषेध आंदोलन

ग्रामीण भारताचा जीवनाधार मोडू नका - ब्राह्मणवाडे

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २२ जानेवारी 

मनरेगा ही केवळ रोजगार योजना नसून ग्रामीण भारताचा जीवनाधार आहे. भाजप सरकारचा हा निर्णय गरीबविरोधी असून काँग्रेस पक्ष जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करीत राहील. असे प्रतिपादन कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. काँग्रेसने रविवारी शिवणी गावात रस्त्यावर उतरून  मनरेगा बचाओ संग्राम आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.

भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही गोरगरीबांच्या जीवनाचा आधार असलेली योजना भाजप सरकारने ती मोडीत काढून तिच्या जागी नवीन योजना लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी कष्टकरी नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा आरोप करत काँग्रेसने रविवारी शिवणी गावात रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

शेतकरी-मजूर विरोधी निर्णयाचा तीव्र निषेध करण्यासाठी, तसेच मनरेगा योजना जुन्याच पद्धतीने, केंद्र सरकारच्या १०० टक्के अनुदानासह तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनाचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड.विश्वजीत कोवासे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदिवासी विभागाच्या राष्ट्रीय सचिव कुसुम आलाम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, पंचायत राज सेलचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, रोजगार सेलच्या कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, सहकार सेलचे अध्यक्ष अब्दुल पंजवानी, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, श्रीनिवास ताटपल्लीवार, उत्तम ठाकरे, गौरव येणप्रेड्डीवार, अनिकेत राऊत, जावेद खान, कविता उराडे, रीता गोवर्धन, शितल ठवरे, तनुजा कुमरे, मालता पुळो, दादा पाटील बानबले, सुधीर बांबोळे, नीलकंठ पेंदाम, भीमराव दुधे, मनोहर गेडाम, एकनाथ भोयर, रुपेश लोणारे, प्रल्हाद गेडाम, डंबाजी बावणे, देवराव कांबळी, लह भोयर, एकनाथ सिडाम, शालिकराम चौधरी, वसंत कावळे, केवळ गुरनुले, संदीप चौधरी, सुनिल भोयर, विकास देशमुख, मनोहर भोयर, परशुराम खोब्रागडे, शंकर गुरनुले, अशोक मारभते, सोनू गडपायले, नामदेव गुरनुले, मारोती चुधरी, अंबादास कावळे, रोशन मुनघाटे, रुपेश चौके, सुधाकर चापले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मनरेगा योजनेत काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!