भरधाव कारने मोटारसायकल स्वारांना उडवले: दोघांचा मृत्यू
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १५ जानेवारी
गडचिरोली शहरापासून ५ किमी अंतरावरील गोगाव फाट्याच्या समोर मंगळवारी रात्री १० वाजता चे सुमारास एका कारने मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वरील दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला आहे.मयुर विलास भुरसे (२५) रा. ठाणेगाव, ता. आरमोरी, विकास मधुकर धुडसे, (२५) रा. डोगरसावंगी, ता. आरमोरी अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार मृतक मयुर विलास भुरसे हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३३ वाय २५१३ ने गडचिरोली वरुन ठाणेगाव कडे १० वाजताचे दरम्यान त्याचा मित्र विकास मधुकर धुळसे सह जात असतांना एक पांढऱ्या रंगाच्या रेनाल्ड कॉप्टर वाहन क्रमांक एम. एच. ३३ व्ही ४३३३ चा चालक आशीष माणीक एंचिलवार, रा. देऊळगाव, ता. आरमोरी याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन हयगयीने व भरधाव वेगाने व रस्त्याच्या परीस्थीतीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे वाहन चालवुन वाहनास जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही मोटरसायकल स्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृतकाचे नातेवाईक कार्तीक श्रीकृष्ण कुनघाडकर वय २० वर्ष, रा. तळोधी मोकासा ता. चामोर्शी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहीते प्रकरणाची चौकशी करीत आहेत.