आपला जिल्हा

५ फेब्रुवारी पासून लॉयड्स मेटल्स च्या क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रवि शास्त्री करणार उद्घाटन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचरोली दि.१४ जानेवारी 

गडचिरोली जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना पुढे येण्याची संधी मिळावी आणि त्यांच्यातील प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे यासाठी लॅायड्स मेटल्स अँड एनर्जी लि. यांच्याकडून गडचिरोलीत ‘जीपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे (गडचिरोली प्रिमियर लिग) आयोजन करण्यात आले आहे.  फेब्रुवारीच्या ५ तारखेला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक रवी शास्री यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. उल्लेखनीय आहे की लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत केवळ गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एकच संघ सहभागी होऊ शकणार आहेत.

लॅायड्स मेटल्सचे संचालक, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक तथा बीसीसीआयच्या नियामक मंडळाच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रमुख एस.एस. खांडवावाला, संचालक ले.कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता यांनी या स्पर्धेच्या तयारीची माध्यमांना माहिती दिली.

या स्पर्धेत प्रत्येक तालुक्याचा एक संघ याप्रमाणे १२ संघ, तसेच महसूल, वन, पोलीस आणि लॅायड्सचे कर्मचारी असे १६ संघ सहभागी होतील. त्यांची चार विभागांमध्ये विभागणी केली जाणार आहे.   ट्वेंटी ट्वेंटी च्या धर्तीवर एकूण ३२ सामने खेळविले जातील. आयपीएल स्टँडर्डनुसार होणाऱ्या या सामन्यांची तयारी ३ महिन्यांपासून सुरू झाली असून सहभागी खेळाडूंच्या साहित्यासह त्यांचा सर्व खर्च लॅायड्सकडून केला जाणार आहे. तालुकानिहाय संघांच्या निवडीसाठी क्रीडा विभागासह पोलीस विभागाची मदत घेतली जाणार आहे.

उत्कृष्ट खेळाडूंना पाठविणार प्रशिक्षणाला

गडचिरोली जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी या सामन्यांमधील उत्कृष्ट खेळाडूंना कंपनीकडून 10 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. त्यात या खेळाडूंनी योग्य चमक दाखविल्यास त्यांना रणजी सामन्यांसह इतर सामन्यांसाठी निवडले जाईल.

या सामन्यांमध्ये अंतिम विजेत्या संघाला ११ लाख ११ हजार १११ रुपये, उपविजेत्या संघाला ७ लाख, तृतीय ५ लाख आणि चतुर्थ बक्षीस २ लाख रुपये राहणार आहे. याशिवाय उत्कृष्ट बॅालर, उत्कृ्ष्ट बॅट्समन, उत्कृ्ष्ट फिल्डर, मॅन ऑफ द मॅच अशांसाठी क्वॅार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल अशा वेगवेगळ्या स्तरावर २५ हजारापासून तर १ लाखापर्यंत वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.गडचिरोलीतील जिल्हा स्टेडियमवर होणारे हे सामने दिवसरात्र खेळविले जाणार आहेत. स्पर्धेच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

स्पोर्टस अकादमीच्या माध्यमातून इतर खेळांना प्रोत्साहन देणार 

लॉयड्स मेटल्स द्वारा गडचिरोली जिल्ह्यासाठी स्पोर्टस अकादमी निर्माण करण्यात आली असून या माध्यमातून क्रिकेट सह कबड्डी, निशानेबाजी यांसह ॲथलेटिक्स चे प्रशिक्षणाच्या संधी जिल्ह्यातील खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. 

पत्रकार परिषदेला लॅायड्सचे पदाधिकारी बलराम सोमनानी, वेदांत जोशी, डॅा.चरणजितसिंह सलुजा, रोमित तोम्बर्लावार, गडचिरोली क्रिकेट असोसिएशनचे मंगेश देशमुख, लॅायड्स स्पोर्टस् अकादमीचे संचालक राजा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!