विशेष वृतान्त

लॉयड्स मेटल्स बिग भारत लीग सीझन २ चे विजेते 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.६ मार्च 

लॉयड्स मेटल्सच्या संघाने आंध्र प्रदेशातील प्रमुख कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या बिग भारत लीग सीझन २ मध्ये शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा १४ फेब्रुवारी ते ४ मार्च २६ दरम्यान विशाखापट्टनम  येथे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट खेळ करत संघाने विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली आणि दोन लक्ष रुपये चे रोख पारितोषिक  मिळवले.

स्पर्धेत शासन, कॉर्पोरेट, वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. यात लॉयड्स मेंटल्स व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचा बाइकर्स स्टुडिओ युनियन हीटर्स, रेल्वेचा इलाईट रेल स्पीकर्स, विनस्मीथ स्टेट डायनामाईटस्, आयुष्यमान व्हाइट कोट वॉरियर्स, फॉरच्यून कॉर्पोरेट किंग्स, पिझ्झा मेड मार्वल्स आणि एसेंट्रीक पॉवर टायकून्स या संघांचा समावेश होता.
कर्णधार विजय कोडापे यांच्या नेतृत्वाखाली लॉयड्स मेटल्सच्या संघाने उत्कृष्ट संघ भावना आणि सर्वांगीण खेळाच्या जोरावर नॉकआउट फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत झालेल्या चुरशीच्या सामन्यात लॉर्ड्स मेटल्स ने फॉरच्यून कॉर्पोरेट किंग्स वर तीन गडी राखून रोमांचक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
ग्रँड फायनलमध्ये लॉयड्स मेटल्स चा सामना एसेंट्रीक पॉवर टायकून्स शी झाला.  लॉयड्स मेटल्सने प्रथम फलंदाजी करत १७४ धावांचे स्पर्धात्मक लक्ष्य उभे केले. त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी आणि चपळ क्षेत्र रक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला ११६ धावांवर रोखले आणि ५८ धावांनी शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात नंद कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावत ४७ धावा केल्या आणि एक गडी बाद केलालॉयड्स मेटल्स. त्यांच्या उत्कृष्ट सर्वांगीण कामगिरीसाठी त्यांना मॅन ऑफ द फायनल मॅच पुरस्कार देण्यात आला. उपदेश राजपूत यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून गौरविण्यात आले, तर कर्णधार विजय कोडापे यांना संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला.
या प्रसंगी लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लि. चे व्यवस्थापकीय संचालक बी . प्रभाकरन यांनी  विजेत्या संघाचे अभिनंदन केले आणि कंपनीत कार्यरत इतर खेळाडूंनाही त्यांच्या आवडत्या खेळाबद्दलची आवड जपण्याचे आवाहन केले. कंपनीकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
हा विजय लॉयड्स मेटल्स साठी अभिमानाचा क्षण असून स्थानिक युवा प्रतिभांना खेळात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!