आपला जिल्हाराजकीय
माजी आमदार दिपक आत्राम यांनी पहील्याच दिवशी नामांकन सादर करून फुंकली तुतारी
अहेरी विधानसभेत आत्राम यांच्या पहील्या नामांकनामुळे अनेकांच्या उंचावल्या भुवया!
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२आक्टो.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात एक अनार सौ बीमार अशी स्थिती असुन दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काल पर्यंत अत्यंत शांत असलेल्या माजी आमदार दिपक आत्राम यांनी आज मंगळवारी नामांकनाच्या पहील्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. उल्लेखनीय आहे की दिपक आत्राम यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करीत तुतारी फुंकली. त्यापूर्वीच धर्मराव कन्या भाग्यश्री यांनी पित्याच्या विरोधात तुतारी फुंकली. एवढेच नव्हे तर त्या प्रचारालाही लागल्या. तर तिसरीकडे भाजपचे नेते राजे अम्ब्रीशराव आत्राम हेही तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर दिपक आत्राम यांचा उमेदवारी अर्ज लक्षवेधी ठरणारा आहे.