बंगाली समुदायाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ११ नोव्हेंबर
कांग्रेस उमेदवार मनोहर तुळशिराम (पाटील) पोरेटी यांनी आज गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील श्रीनिवासपूर येथे काली मातेच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या बंगाली जनसमुदायासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी बंगाली जनसमुदायाच्या अडचणी समजून घेत त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर, सर्वांनी एकत्र येऊन महाप्रसादाचा आस्वाद देखील घेतला.
सरपंच राकेश बारसागडे यांचा पक्षप्रवेश
काल प्रचाराच्या दरम्यान विधानसभा मतदारसंघातील घोटचे गावचे माजी सरपंच श्री. राकेश बारसागडे यांनी आपल्या काँग्रेस पक्षात मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राकेशजी नक्कीच काँग्रेस पक्षाला तळागळात पोहचवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
नवग्राम येथे बंगाली समुदायाची बैठक.
मनोहर तुळशिराम (पाटील) पोरेटी यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या निमित्ताने नवग्राम येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपस्थित राहून बंगाली जनसमुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच महायुतीचा भ्रष्ट कारभार त्यांच्यासमोर मांडला. प्रसंगी आगामी विधानसभेत कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी ताकद उभी करावी अशी विनंती केली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.