सुरजागड येथून लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिला गंभीर
महिलेच्या कुटुंबास कंपनीने तात्काळ आर्थिक मदत करावी - डॉ, प्रणय खुणे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली 9 ऑक्टोबर
गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथे काल दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सुरजागड येथून लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने गोविंदपूर येथील रहिवासी महिलेला धडक देऊन गंभीर जखमी केले व ती महिला सध्या गडचिरोली येथील अतिदक्षता विभागात भरती आहे व तिचे अनेक ठिकाणी हाडे मोडले आहेत. काल दिनांक 8 आक्टोंबर रोजी सुमारे ११.३० वाजता कामावरून आपल्या स्वगावी म्हणजे गोविंदपूर येथे संगीता कोवे ही महिला पैदल जात होती सदर महिलेला मागून येणाऱ्या सुरजागड येथील लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक ने जबर धडक दिली व या धडकेत महिलेच्या डोक्याला जबर मार लागून ती तिथेच बेशुद्ध पडली ट्रक ने धडक दिली. हे कळताच गावातील नगरिकांची मोठी गर्दी जमली व तिला गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले.
तिला मोठ्या दवाखान्यात भरती करणे गरजेचे आहे परंतु आर्थिक परिस्थिती अभावी सदर महिला गडचिरोली येथे भरती होऊन आपला उपचार करीत आहे.
घटनेतील ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला आहे, धडक दिलेल्या ट्रकचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत व सध्या या महिलेची प्रकृती अतिशय गंभीर आहे व तिला जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे सदर महिला ही स्वतः तिच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहे या महिलेची आई लकवा ग्रस्त आहे , व एक बहिण आहे यांचा संपूर्ण कुटुंब या महिलेच्या रोजी वर चालतो. ही माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ . प्रणय खुणे व मानव अधिकार संघटनेचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी यांनी या अपघातग्रस्त महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भेट दिली व मानवाधिकार संघटनेच्या वतीने व स्वतःकडून आर्थिक मदत केली आणि लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीच्या वतीने या महिलेस पुढील उपचारा करिता आर्थिक मदत करण्यात यावी व या महिलेच्या कुटुंबाकरिता पुढील जीवन जगण्याची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे