गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरात बस सेवा सुरु; विद्यार्थ्यांना दिलासा
अजय कंकडालवार यांच्या सुचनेची रापनि कडून दाखल
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २१ सप्टेंबर
अहेरी विधानसभा क्षेत्रातील कांग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी नागरिकांच्या अडचणीची तात्काळ दखल घेऊन रापनिच्या अहेरी आगाराला सुचना देऊन गोमनीटोला व श्रीरामपूर या मार्गावरील बंद करण्यात आलेली बस सेवा तात्काळ सुरू करण्याच्या केलेल्या विनंतीचा सन्मान करीत सदर मार्गावरील बस सेवा पुन्हा सुरू केली. यामुळे या भागातील नागरिक व विद्यार्थ्यांनी कंकडालवार आणि मडावी यांचे आभार मानले आहेत.
मुलचेरा तालुक्यातील गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरातील एसटी बस फेरी बंद असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना व शालेय विध्यार्थ्यांना अडचण भासत होती. नागरिकांना कोणत्याही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करावा लागत होता. तसेच विध्यार्थ्यांना शाळेत येण्या – जाण्यासाठी खूपच अडचण भासत होत होती. काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांना मुलचेरा तालुका दौऱ्या दरम्यान गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरातील नागरिक,शालेय विद्यार्थ्यांनी बसची समस्या बाबत लक्षात आणून दिली होती.
अजय कंकडालवार दौऱ्यावेळी आगारातील प्रमुख अधिकाऱ्यांची दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्या परिसरातील एसटी बस बंद असल्याने नागरिकांना व विध्यार्थ्यांना अडचण भासत असल्याची अधिकाऱ्यांना लक्षत आणून दिले.तसेच लवकरत लवकर गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरात एसटी बस फेरी सुरु करण्यात यावी म्हणून आगारातील अधिकाऱ्यांना माहिती दिले असता.कंकडालवार दिलेले माहितीची दखल घेत अखेर त्या परिसरात एसटी बसफेरी सुरु केले. बस फेरी सुरु झाल्याने नागरिक वेळेवर काम करून घेत आहे आणि शालेय विध्यार्थी वेळेवार शाळेत जाउन शिक्षण घेत आहे.बस सुरु करून दिल्याबद्दल गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरातील समस्त नागरिक,शालेय विध्यार्थी अजय कंकडालवार यांचे आभार मानले आहे.