जिल्हा महाग्रामसभेच्या समितीचे पुनर्गठन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ डिसेंबर
गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमी येथे २१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील ग्रामसभांचे कार्यकर्ते एकत्र येऊन संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय सभेत गडचिरोली जिल्हा महाग्रामसभेच्या जिल्हास्तरीय समितीचे पूनर्गठण करण्यात आले. महाग्रामभेचे जेष्ठ कार्यकर्ते नितीन कविशवर पदा, रा.एट्टापल्ली यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. देवाजी तोफा होते.
पेस क्षेत्रात प्रत्येक गावात ग्रामसभा आहेत. या ग्रामसभाना मिळालेले संवैधानिक न्याय हक्क, अधिकार आणि पेसा, जैवविविधता, वनहक्क कायद्यातील गौणवनोपजाचे संरक्षण, संवर्धन, काढणी,वापर, विनिमय आणि आनुषंगिक अंमलबजावणीचे अधिकार मिळाले आहेत.ग्रामसभेचा जल, जंगल, जमीनीवरील हक्क अश्या मुद्द्यावर ग्रामसभा जिल्ह्यात अधिक प्रभावी होऊ लागल्याने जिल्यातील ग्रामसभांना न्याय हक्क मिळावेत म्हणून संघटित लढा देण्यासाठी आणि ग्रामसभांचे शिक्षण, प्रशिक्षण करीत सक्षमीकरणासाठी जिल्हा महाग्रामसभेचे पुनर्गठन करण्यात आले.
प्रत्येक गाव ग्रामसभा मधून एक महिला व एक पुरुष निवड करून इलाका महा ग्रामसभेत पाठविले आणि इलाका ग्रामसभेतुन तीन प्रतिनिधी तालुक्यात महा ग्रामसभेत निवड केली. तालुका महाग्रामसभेतून जिल्हा महा ग्रामसभेची निवड करण्यात आली. आणि अश्या प्रकारे जिल्हा महा ग्रामसभा ची बैठक गडचिरोली येथे पार पडली आहे .
जिल्हा महाग्रामसभेचे जिल्हाध्यक्ष नितीन कविशवर पदा, एट्टापल्ली , उपाधक्ष विनोद मंगलू पुलसो, सिरोंचा, साईनाथ कोडाप चामोर्शी, सचिव शिवाजी नारोटे, गडचिरोली सहसचिव चिन्नू सुकू महाका, भामरागड कोषाधक्ष विद्या विनोद दुगा, बेलगाव आणि बाराही तालुकातील ७० महिला पुरुष सदस्य आहेत. सल्लागार समिती डॉ. देवाजी तोफा, ऍड लालसू नगोटे, सदानंद ताराम, रविंद्र कोवे माजी आमदार हिरामण वरखडे, पुष्पलता कुमरे , शुभदा देशमुख, डॉ. सचिन मडावी, दिलीप गोडे माधवराव गावड , इजामसाय सनू कांटेंगे, भारती इष्टाम भामरागड, कुंदा विट्टल किरंगे, देवाजी रामसू पदा, वर्षा देवेंद्र कन्नाके, पौर्णिमा पुषोत्तम इष्टाम, ईश्वर गोविंदा कुमरे, नरेश मडावी, वासुदेव कोमटी कोडाप यांचा समावेश आहे. ही जिल्हा महाग्रामसभा पुढील पाच वर्षे कार्यरत राहील.

