कांग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची महायुतीच्या भ्रष्टाचारावर कठोर टीका
कांग्रेसची परिवर्तन यात्रा गडचिरोली विधानसभा क्षेत्रात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २१ सप्टेंबर
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी
संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात जिल्हा काँग्रेस च्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची महायुतीच्या भ्रष्टाचारावर कठोर टीका केली.
गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, अनखोडा, जैरामपुर, लक्ष्मणपुर, किष्टापुर, गणपुर, उमरी, सेलुर, मुधोली रीठ, सगणापुर येथे परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशी महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा सर्वसामान्य जनतेसमोर पंचनामा केला. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अँड. विश्वजीत मारोतराव कोवासे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांचे सह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.
ब्राह्मणवाडे म्हणाले की महायुती सरकारची तिरडी ही विकासाच्या भकास महाराष्ट्र करीत आहे. गडचिरोली विधानसभेत विकासकामांचा बोजवारा उडाला असून मतदारांना लालुच दाखविण्यासाठी लाडकी बहीण सारखी फसवी योजना आखली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे देताना सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. त्यामुळे शासकिय सेवेतील आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी आशा, वृद्धांचे पेंशन, विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे पैसे थकवले आहेत. आरोग्य, शिक्षण, सिंचन, कृषी योजनांचा बठ्ठ्याबोळ झाला असल्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत कांग्रेसला शक्ती देउन परिवर्तन घडवून आणा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
परिवर्तन यात्रेत पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धुर्वे मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई प्रमोद भगत, विनोद पाटील येलमुले, सरपंच नीलकंठ पाटील निखाडे, निकेश भाऊ गद्देवार, उमेश भाऊ कुमरे, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, रेखाताई येलमुले सरपंच अनखोडा, विवेक पाटील गुरनुले, संदीप भाऊ, सुरेंद्र नारनवरे, अरुण भाऊ कुकुडकर, बोडके साहेब, प्रदीप झाडे, लक्ष्मण पोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल बारसाकडे, युवक काँग्रेसचे मुन्ना गोंगले, मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.