आजपासून नक्षलवाद्यांचे २० व्या स्थापना दिनानिमित्त एक महिणा विशेष अभियान
जादूचे काम करणारे "माओवादी पक्ष, पीएलजीए आणि संयुक्त मोर्चा" यांना लढ्याची हत्यारं म्हणून विकसित करावे.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २१ सप्टेंबर
नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने आगस्ट महिन्यात एक तेवीस पानांचे बुकलेट काढून त्यांच्या वास्तविक स्थितीचे आकलन करून आपण पोलीसांच्या सततच्या माऱ्याने पिछाडीवर गेल्याचे मान्य करतानाच २० व्या स्थापना दिनानिमित्त पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी (पीएलजीए) आणि संयुक्त मोर्चा ला अधिक मजबूत करण्यासाठी २१ सप्टेंबर ते २० आक्टोंबर या महिणाभराचे कालावधीत विशेष अभियान राबविण्यात यावे असे आवाहन केले आहे. त्यामुळे झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या कालखंडात नक्षली अभियानात नेमके काय करणार याकडे लक्ष लागले आहे.
भाकपा माओवादीच्या 20 व्या स्थापना वर्षानिमित्त
21 सप्टेंबर ते 20 अक्टूबर पर्यंत माओवाद्यांना ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि त्यांचेसमोर जी आव्हानं उभी राहिली आहेत. त्यांना समोरे जाण्याचे आवाहन केले आहे.
यासाठी जादूचे काम करणारे “माओवादी पक्ष, पीएलजीए आणि संयुक्त मोर्चा” यांना लढ्याची हत्यारं म्हणून विकसित करावे. माओवाद्यांना संपवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन कगार चा मुकाबला करावा असेही म्हटले आहे.
माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने जारी केलेल्या बुकलेट मध्ये मागिल २० वर्षांचा मागोवा घेताना असे म्हटले आहे की सरकार आणि पोलीसांच्या सततच्या कारवायांमुळे माओवादी संघटनात्मक पातळीवर मागे आले. ऑपरेशन ग्रीन हंट ते ऑपरेशन कगार द्वारे केलेल्या हल्ल्यात ५२५० माओवादी मृत्यू पावले. यात २८ केंद्रीय नेते होते. यातून माओवाद्यांचे मोठे नुकसान झाले. तर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३०९० पोलीसांना मारले तर ४०६० पोलीसांना जखमी केले.
आजपासून सुरू झालेल्या अभियानात नक्षली संघटन वृद्धीसाठी प्रयत्न करताना विद्यार्थी, छोट्या शाळकरी मुली, जंगल व्याप्त क्षेत्रातील पाड्यांवरील आदिवासी, सरकार दरबारचे पिडीत, त्रासलेले युवा, यासह शहरी बुद्धीजीवी, जेएनयू , डीयू आणि मेट्रो पोलिटियन शहरांतील अन्यायाची चीड असलेले विद्यार्थी युवक, युवती यांना लक्ष्य करतात. यावेळी ते यापेक्षा कसली रणनीती आखतात. याकडे लक्ष लागले आहे.
पोलीस दल सर्व सामर्थ्यानिशी सज्ज
देशभरात नक्षल्यांविरोधातील कारवायांमुळे नक्षली जवळजवळ संपलेले आहेत. ते शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या अभियानाकडे संपूर्ण नक्षलप्रभावित क्षेत्रातील पोलीस आणि संबंधित यंत्रणेचे लक्ष आहे. नक्षल्यांचे कोणतेही अभियान यशस्वी होणार नाही. विशेष करून पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया जिल्ह्यासह छत्तीसगड सीमावर्ती भागात दोन्ही राज्यांचे पोलीस सक्षमपणे कारवाया करीत आहेत. त्यामुळे या भागात माओवाद्यांचे कोणतेही अभियान यशस्वी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पोलीस विभागाने अतिदुर्गम भागात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. आणि नक्षलवाद हा देशाच्या विकासाचा मार्ग नाही. नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे माओवाद्यांच्या कोणत्याही आवाहनाला प्रतिसाद मिळणार नाही. महाराष्ट्र पोलीस दल माओवाद्यांच्या कोणत्याही रणनीती साठी सज्ज आहे.
संदीप पाटील, डीआयजी नागपूर