मोदींंच्या विकसीत भारतासाठी अशोक नेतेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अशोक नेते यांनी शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ मार्च
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात २०३५ चा विकसीत भारत पहायचा असेल तर गडचिरोली लोकसभेतून भाजपचे अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संसदेत पाठवा. असे आवाहन भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले. ते भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत बोलत होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम पूर्व दिवशी खा. नेते यांनी एका मोठ्या रॅलीने शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शहरातील अभिनव लॉन येथे भाजपची पहीली सभा संपन्न झाली. सभेला उमेदवार अशोक नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी बावनकुळे म्हणाले की मोदींनी मागिल दहा वर्षात भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवले. आता दारिद्रय मुक्त विकसीत भारतासाठी अबकी बार ४०० पार हा निर्धार केला आहे. यासाठी अशोक नेते यांना प्रतिस्पर्ध्याची अनामत रक्कम जमा होईल एवढ्या प्रचंड मताने विजयी करा. सुत्रसंचालन रविंद्र ओल्लालवार तर आभार प्रकाश गेडाम यांनी केले.