आपला जिल्हा

आदिवासी विकास सहकारी संस्थाकडे खरेदी केलेल्या धानाची तात्काळ उचल करा

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २१ फेब्रु.

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अभिकर्ता म्हणून आदिवासी विविध कार्यकारी संस्था मार्फत धान खरेदी केली जाते. या सत्रात डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील संस्थांमार्फत जवळपास सात लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. परंतु आजतागायत कुठल्याही केंद्रावरून धानाची उचल झालेली नाही. गडचिरोली जिल्ह्यात ११४ धान खरेदी केंद्रावर खरेदी सुरू आहे. यातील अनेक संस्था उघड्यावर खरेदी करीत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व संस्थाना धान उचल न केल्याने मोठी तुट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे संस्थांकडील धानाची त्वरित उचल करण्यात यावी व आदिवासी विविध संस्थांना होणारा आर्थिक फटका कमी करावा अशी मागणी भाजपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आधारभूत खरीप हंगाम २०२३-२०२४ संपण्याच्या मार्गावर असून खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी कमी झालेली आहे. या वर्षी मागील वर्षीपेक्षा धानाची आवक घटलेली आहे. त्यामुळे खरेदी केंद्राच्या समस्या वाढलेल्या आहेत. शासन निर्णयानुसार खरेदी केल्यानंतर दोन महिन्यात धान उचल करावयाची असताना सुद्धा आदिवासी विकास महामंडळ याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते. बहुतांश केंद्रावरील धान उघड्यावर ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले आहेत. तापमानातील बदलामुळे अवकाळी पाऊस अधून मधून येत असल्याने उघडयावरील धान भिजून धानाची नासाडी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षात वेळेवर उचल केल्यामुळे धानाची नासाडी झाली नाही. परंतु यावर्षी राईस मिलर्सनी आदेश मिळाल्यानंतरही उचल सुरु केलेली नाही. शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुद्धा रखडली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!