आपला जिल्हाक्राईम स्टोरी

पाच लक्ष रुपयांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना अटक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ जानेवारी

रस्त्याच्या कामावर वनक्षेत्रातील गौनखनिज अवैध रित्या वाहतूक करणारे, जप्त केलेले ट्रैक्टर्स आणि त्यावरील आकारलेला दंड कमी करण्यासाठी मागितलेली लाचेची पाच लक्ष रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील चमुने आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पेरमिली येथे अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार रस्त्याचे काम करतो. तुमरगुंडा ते कासमपल्ली पर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. त्या कामावर सुरू असलेले काही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी पकडले होते. ही वाहने सोडण्यासाठी व आकारलेला ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल १० लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या अनुषंगाने सापळा रचण्यात आला असता, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे लाचखोर प्रमोद आनंदराव जेनेकर यांच्या शासकीय निवासस्थानी झडती घेतली असता ८५ हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

सदर कारवाई पेरमेली येथे करण्यात आली असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माणकीकर अँटी करप्शन ब्युरो नागपूर, सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक अनामिका मिर्झापुरे अँटी करप्शन ब्युरो गडचिरोली, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सुनील पेद्दीवार, किशोर जौंजाळकर, संदीप घोरमोडे, संदीप उडान, नरेश कस्तुरवार व सहकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!