आपला जिल्हा

देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे

आरमोरी तालुक्यात शेकापने उघडले खाते

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ३० डिसेंबर 

आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतची शुक्रवारला सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या प्रियंका रोहिदास कुमरे यांनी सात विरुद्ध दोन अशी आघाडी घेवून सरपंच पदाची निवडणूक जिंकली.

देलनवाडी, नागरवाही, कोसरी या तीन गावांची गट ग्रामपंचायत असलेल्या नऊ सदस्यीय देलनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त होते. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रियंका रोहिदास कुमरे यांना ग्रामपंचायत सदस्य इना मेश्राम, मुनिचंद मडावी, शुभांगी मसराम, राजेंद्र पोटावी, त्रिलोक गावतुरे, अश्विनी गरमळे या सात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

प्रियंका कुमरे या देलनवाडीच्या सरपंच झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, जिल्हा सहचिटणीस रोहिदास कुमरे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, अशोक किरंगे, डॉ. गुरुदास सेमस्कर, क्रीष्णा नैताम, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम, गंगाधर बोमनवार, दामोदर रोहनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, ॲड. नर्गिस पठाण, निशा आयतूलवार, कविता ठाकरे, सुनिता पदा, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!