आपला जिल्हा

वाघाच्या हल्ल्यात कापूस वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू

दक्षिण गडचिरोलीतील चिंतलपेठ येथील घटना; आठवड्यातली दुसरी घटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ जानेवारी

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. सुषमा देविदास मंडल (५५) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. ३ जानेवारी रोजी गडचिरोली तालुक्यातील  येथे वाघाने सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेला ठार केले होते. 

प्राप्त माहितीनुसार मृतक सुषमा ही चिंतलपेठ गावालगत असलेल्या गोंदुबाई दुर्गे यांचे शेतात कापूस वेचणीसाठी दोन महिला सहकाऱ्यांसह सकाळी गेली होती. दरम्यान दुपारच्या सुमारास शेतात कुठूनतरी आलेल्या वाघाने, कापूस वेचणीसाठी वाकून काम करीत असलेल्या महिलेवर अचानक हल्ला करून तिला ठार केले. वाघाच्या हल्याची चाहूल लागताच सुषमा व तिच्या सहकारी महिलांनी जोरदार किंकाळ्या फोडल्या. आणि जिवाच्या आकांताने ओरडत पळत सुटल्या. जवळपासच्या शेतात काम करणारे लोकही या हल्ल्याने आरडाओरड करू लागले परिणामी वाघ पळून गेला. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान काहींनी याची माहिती वनविभाग व पोलीसांना दिली. नंतर वनविभाग व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रवाना केला.

उल्लेखनीय आहे की ३ जानेवारीची घटना उत्तर गडचिरोलीत घडली तर रविवारची घटना दक्षिण गडचिरोलीत अहेरीच्या जवळ घडली. यापूर्वी सुध्दा दक्षिण गडचिरोलीत बिबट्यांचे हल्ले झाले आहेत. वाघाच्या या हल्ल्याने दक्षिण गडचिरोलीतही वाघांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ संपूर्ण जिल्हाभरात वाघ, बिबट आणि रानटी हत्तींचा वावर वाढताना दिसतो. या पार्श्वभूमीवर वनमंत्रालयाने गडचिरोली येथे वन्यजीव विभाग निर्माण करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!