आपला जिल्हा

मार्कंडेश्वराच्या जीर्णोद्धारास तात्काळ सुरुवात न केल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी

मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांचा इशारा

 पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १४ डिसेंबर 
मागील आठ वर्षांपासून रखडलेल्या मार्कंडेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम मार्गी लावण्यासाठी खासदारांनी संसदेत तर आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून जीर्णोद्धाराच्या कामाला तात्काळ सुरुवात न केल्यास लोकप्रतिनिधीना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ट्रस्टचे सचिव मृत्युंजय गायकवाड, सरपंच संगीता मोगरे, पोलीस पाटील आरती आभारे,विश्वस्त रामुजी पाटील तिवाडे ,उपसरपंच उमाकांत जुनघरे, छबिलदास सुरपाम व अनेक गावकरी उपस्थित होते.
पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे चामोर्शी येथील मार्कंडेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. या बांधकामाला पूर्णत्वास नेण्यासाठी त्वरित गती द्यावी, या मागणीला घेवून मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिका-यांनी खासदार , आमदार , पुरातत्व विभागाचे अधिकारी यांची अनेकदा भेट घेतली मात्र आतापर्यंत आश्वासनच मिळाले. टेंडर निघाले, काम होईल त्या आश्वासनाला आठ वर्ष झाले अद्याप जिर्णोद्धार कामाला सुरवात झाली नाही आता दोन महिन्या नंतर मार्कडेश्र्वर यात्रा येणार म्हणून जीर्णोद्धाराच्या कामाचा मुहूर्त कधी निघणार अशी विचारणा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
 पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे आजतागायत मंदिर बांधकाम रखडलेले आहे. त्यामुळे येत्या काळात महाशिवरात्री यात्रेचा विचार करता संबंधित विभागाने मार्कंडेश्वर देवस्थान मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी खासदार अशोक नेते व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महानिर्देशक डॉ. आर. त्रिपाठी यांच्याकडे केली होती. मात्र तीही फोल ठरली. तर खासदार व आमदार यांनीही दिल्लीच्या भारतीय पुरातत्व खात्याचे अधिकाऱ्यांना भेटून लवकरच काम सुरू होणार असल्याचे वर्तमान पत्रातून प्रसिध्द केले होते. ते ही आश्वासनच राहीले.  दोन महिन्यानंतर महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या मार्कंडेश्वर यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या यावर्षीही हिरमोड होणार असून मंदिरात दुरूनच दर्शन घ्यावे लागणार की काम सुरू होणार अशी भाविक विचारणा करीत आहेत .
खासदार अशोक नेते यांनी ससंदेत तर आमदार डॉ देवराव होळी यांनी विधानसभेच्या चालू अधिवेशनात यावर तोडगा काढून तात्काळ जीर्णोद्धाराचे काम सुरू न केल्यास लोकप्रतिनिधीना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी पत्रकार परिषदेत घोषित केले आहे
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!