आपला जिल्हा

नक्षलवादी आणि पोलीस चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

दुर्गेश वट्टी कसनसुर दलम उपकमांडर असे मृतकाचे नाव

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१४ डिसेंबर 

गुरुवारी गोडलवाही पोलीस स्टेशन पासून १० किमी अंतरावर छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी तळ ठोकून असल्याची गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्याआधारे गडचिरोली पोलीस दलाकडून तातडीने राबवली जात असलेल्या शोधमोहीम दरम्यान माओवाद्यांनी अभियान पथकावर अंदाधुंद गोळीबार केला असता पोलीस दलाने प्रत्युत्तर देत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले.

सदर चकमक जवळपास एक तास सुरू होती. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता  एक एके ४७ आणि एक एस एल आर रायफल सह दोन पुरुष माओवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यापैकी एकाची प्राथमिक ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी असल्याचे सांगितले जात आहे.

वट्टी हा २०१९ मधील जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. ज्यात गडचिरोली पोलिसांचे १५  जवान  शहीद झाले होते. पुढील ऑपरेशन आणि परिसराचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह गडचिरोली येथे आणले असुन दुसऱ्या मृतकाची ओळख पटविण्याचे काय सुरू आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!