आपला जिल्हाराजकीय

९ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गडचिरोलीत

कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स च्या स्टील प्लांट चे उद्घाटनासह वडसा - गडचिरोली रेल्वे चे भूमिपूजन करणार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० नोव्हेंबर

देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा हे आगामी ९ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे येणार असून खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नातून मंजूर आणि पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार डॉ देवराव होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, महाभारत खटी, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

खा. नेते यांनी यावेळी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात लॉयड्स मेटल्सच्या लोहप्रकल्पातून ऊद्योग विरहीत जिल्ह्यात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लोहखनिज प्रकल्पाचे उद्घाटन आणि ३००० कोटींच्या प्लॅनेट प्लांटचे भूमिपूजन गृहमंत्री अमित शहा करणार आहेत. यासह वडसा ते गडचिरोली या ५२.२८ किमी रेल्वेमार्गच्या १८८८ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या बांधकामाचे ऑनलाईन भूमिपूजन आणि चिचडोह बॅरेजचे ऑनलाईन उद्घाटनही ते करणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत. या मुळे जिल्ह्यातील रोजगाराभिमुख विकासकामांना गती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील लोहदगडाच्या अनियंत्रित वाहतूकीमुळे रस्त्यांची चाळण झाली असून दक्षिण गडचिरोलीत अपघातांची मालिका सुरू झालेली असून या वाहतूकीमुळे आणखी किती बळी घेणार? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत. मात्र हे थांबविण्यासाठी विशेष कॉरिडॉर निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने स्वीकार केला असुन लवकरच त्याचे बांधकाम सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा करु. असे श्री नेते यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत सर्वांनीच वैयक्तिक काळजी घेतली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काल बुधवार पासून दिवसा १२ तास वीज पुरवठा सुरू झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!