आपला जिल्हाराजकीय

गडचिरोली जिल्ह्यात एका दिवसात पोलीस स्टेशन उघडले जाऊ शकते तर रस्ते कां दुरुस्त होऊ शकत नाही? प्रागतिक पक्ष महाराष्ट्र आघाडीचा गंभीर प्रश्न

सरकारच्या अनीती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ डिसेंबरला उलगुलान महामोर्चा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २९ नोव्हेंबर 

राज्याचे गृहमंत्री हे एका दिवसात वांगेतुरी सारख्या अतिदुर्गम गावात पोलीस स्टेशन ऊभे करु शकतात तेच गृहमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अहेरी ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर लोहदगडाची वाहतूकीमुळे चाळण झालेल्या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती का करु शकत नाही. या महामार्गावर आणखी किती बळी घेणार यासह अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करीत प्रागतिक पक्ष महाराष्ट्र आघाडीने राज्य सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात ९ डिसेंबर रोजी उलगुलान अर्थात सरकार विरोधात जनाक्रोश महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चात गडचिरोली जिल्ह्यातून ५० हजारांहून अधिक पिडीत नागरिक सहभागी होतील अशी माहिती आघाडीचे संयोजक शेकापचे चिटणीस भाई रामदास जराते यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात विकासाच्या नावावर हजारो हेक्टरवरील जंगलतोड करुन पाचव्या अनुसूची क्षेत्रातील विशेष तरतुदी आणि कायदे, नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे मंजूर आणि प्रस्तावित लोह खाणी आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या वतीने उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार असून या महामोर्चात जिल्ह्यातील आदिवासींसह गैरआदिवासी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रागतिक पक्षांनी केले आहे.

गैरआदिवासी, ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणाला आदिवासी समाजाने कधीच विरोध केलेला नसतांना भाजपने पेसा कायदा विरोधी वातावरण जिल्ह्यात निर्माण करुन वेळोवेळी समाजात तेढ निर्माण केली आणि बेकायदेशीर खाणींचे रोजगाराच्या नावावर समर्थन करुन जिल्ह्याला उध्दवस्त करण्याचे षडयंत्र रचले असून हे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

या महामोर्चाचे नेतृत्व शेकापचे नेते आमदार भाई जयंत पाटील, माकप नेते काॅ. अशोक ढवळे, भाकपचे राष्ट्रीय सचिव काॅ. डॉ.भालचंद्र कांगो, राज्य सचिव काॅ. ॲड. सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष हरिष उईके हे करणार आहेत. आमदार शामसुंदर शिंदे, आमदार काॅ. विनोद निकोले, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार यांचेसह जनता दल (सेक्युलर) चे नाथाभाऊ शेवाळे, शामदादा गायकवाड, भाकपा ( माले) लिबरेशन पार्टीचे काॅ. श्याम गोहील, श्रमिक मुक्ती दलाचे काॅ. भारत पाटणकर, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. किशोर ढमाले हे प्रामुख्याने या महामोर्चात सहभागी होणार आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या

पेसा, वनाधिकार कायद्यांचा उल्लंघन करून बळजबरीने खोदण्यात येत असलेल्या सुरजागड, झेंडेपारसह मंजूर व प्रस्तावित लोहखाणी तात्काळ रद्द करा. पाचव्या अनुसूची क्षेत्रातील ग्रामसभांचे स्वयंशासनाचे अधिकार डावलणे बंद करण्यात यावे. खाण विरोधी जनआंदोलन करणाऱ्या नागरिकांना नक्षल समर्थक ठरवणे बंद करा,मच्छीमार समाजाला नदी, नाले, तलावांची मालकी द्यावी. ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करा. आदिवासींची डी लिस्टिंग करण्यात येऊ नये. धानाला रुपये ३,५००/- हमीभाव द्या. यासह वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई रक्कम तातडीने देण्यात यावी. व जंगली प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा. जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागण्या आहेत.टं

पत्रकार परिषदेला भाई रामदास जराते, काॅ. महेश कोपूलवार, रोहिदास राऊत, राज बन्सोड, मिलिंद बांबोळे, काॅ. अमोल मारकवार, ईलियास पठाण, प्रशांत मडावी, कुणाल कोवे, विनोद मडावी,काॅ. देवराव चवळे, भाई शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, तितिक्षा डोईजड,भाई अक्षय कोसनकर, हंसराज उंदिरवाडे, अशोक खोब्रागडे, संजय वाकडे, प्रकाश खोब्रागडे, प्रतीक डांगे, विजय देवतळे, कैलास रामटेके, सतिश दुर्गमवार, प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!