आपला जिल्हा

कंत्राटीकरणाच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे धरणे आंदोलन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १८ आक्टोंबर 

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून खाजगीकरण  आणि कंत्राटीकरणाचा सपाटा सुरु केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या अनेक युवकांचा भविष्य धोक्यात आला आहे. भाजप सरकार उप्रदर्वी असून समाजातील प्रत्येक घटकाला दुखवण्याचे काम त्यांनी केले आहे.  खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारणे जि. प. च्या शाळा बंद करणे, नोकर भरतीत कंत्राटी पद्धत आणणे असे कृत्य हे सरकार करीत असून सर्वसामान्य गोरगरीब आणि बहुजनाच्या पोरांना शिक्षणापासून व मुख्य प्रवाहात आणन्यापासून दूर ठेवण्याचा कदाचित भाजप सरकारचा प्रयत्न असून त्याच्या निषेधार्थ, कंत्राटी भरती बंद करा या प्रमुख मागणीला घेऊन खाजगीकरणाच्या विरोधात गडचिरोली येथे काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्या नंतर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करू नये या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आले.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी. जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यकक्ष राजेंद्र बुल्ले, धानोरा तालुकाध्यक्ष परसराम पदा, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, आदिवासी सेल अध्यक्ष छगन शेडमाके, बंगाली सेल अध्यक्ष बिजन सरदार, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे, विनोद लेनगुरे, प्रभाकर कुबडे, दिलीप घोडाम, जयंत हरडे, गिरीधर तितराम, सुरेश भांडेकर, नरेंद्र गजपूरे, अतुल मल्लेवार, निकेश गदेवार, आय. बी. शेख, बाबुराव गडसूलवार, दीपक रामने, श्रीराम दुगा, उत्तम ठाकरे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, राजेंद्र ठाकरे, मनोज ढोरे, महादेव भोयर, ढिवरू मेश्राम, निकेश कामीडवार, प्रफुल आंबोरकर, जितेंद्र मुनघाटे, यादव गोमस्कर, स्वप्नील ताडाम, मुन्नासिंग चंदेल, अरुण पुण्यप्रेड्डीवार, संतोष पीपरे, देवेंद्र बांबोळे, संजय पाल, अमर भर्रो, घनश्याम मुरवतकर, ज्ञानेश्वर पोरटे, दुष्यन्त वाटगुरे, संदीप भोयर, श्रीनिवास ताटपल्लीवार, कल्पना नांदेश्वर, ताराबाई भोयर, पल्लवी हलामी, वैष्णवी रेचनकर, पूजा जाधव, प्रियंका पवार, करिष्मा उईके, अविनाश बांबोळे, निखिल शेंडे, आकाश मोहुर्ले, प्रीतम आत्राम, मयूर कोडापे, संकेत  सुरजागडे, भूषण कुणघाडकर, रोशन कोहळे, निकेश सातपुते, अक्षय देवतले सह शेकडोच्या संख्येने युवक युवती काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!