रानटी हत्तींसह नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा; मागणीसाठी जिल्हा काँग्रेसचा मुख्य वनसंरक्षकाला घेराव

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१९ आक्टोंबर
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात मागील तीन वर्षांपासून रानटी हत्तीचे आगमन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस रानटी हत्ती आणि वाघाच्या हल्यात अनेक नागरिकांना जिवही गमावावा लागत आहे. आता काही ठिकाणी पीक निसव्यावर तर काही ठिकाणी कापणीवर येत आहे. अश्यात हत्तीचा आणि नरभक्षक वाघाचा हैदोस वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे हत्ती आणि वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. यासाठी गडचिरोली वनवृत्तात वन्यजीव विभागाची निर्मिती करण्यात यावी. आतापर्यंत हत्ती, वाघांसह जंगली प्राण्याने ज्या शेतकऱ्याचे नुकसान केले त्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, जंगली प्राण्याच्या हल्यात मयत झालेल्या मृताच्या परिवारास आर्थिक मदत करण्यात यावी, नुकसान भरपाई देत असताना जाचक असलेल्या अटींमध्ये शिथिलथा देण्यात यावी, या मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला घेराव करून आंदोलन करण्यात आले व मुख्य वनसंरक्षकांना भेटून १५ दिवसाच्या अल्टीमेटम सह निवेदन देण्यात आले. निश्चित कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केली.
आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंद गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस अध्यक्ष लॉरेन्स गेडाम, किसान सेल अध्यक्ष वामन सावसाकडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर, माजी जि. प. सदस्य कविता भगत, प्रभाकर कुबडे, तेजस मडावी, पुष्पलता कुमरे, मंगला कोवे, सुरेश भांडेकर, देवेंद्र ब्राह्मणवाडे, राजाराम ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, योगेंद्र झंजाळ, निकेश कामीडवार, प्रफुल आंबोरकर, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, कमलेश खोब्रागडे, ढिवरू मेश्राम, जावेद खान, पुरुषोत्तम सिडाम सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.