आपला जिल्हाक्राईम स्टोरी

पोलिसांची रेकी करणाऱ्या अबुझमाड सप्लाय टीमच्या विभागिय समिती सदस्याला गडचिरोली पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण १६ लाख रुपयांचे बक्षीस.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१४ आक्टोंबर

नक्षल्यांचे शक्ती केंद्र मानल्या गेलेल्या अबुझमाडच्या साहित्य पुरवठा टीमचा विभागिय समिती सदस्य चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा, वय ४८ वर्षे, रा. टेकामेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) यास गडचिरोली जिल्ह्यातील पेंढरी व जारावंडी पोलीस स्टेशनची रेकी करतानाअटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.

कोरसा हा गडचिरोली जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सिमेलगत असलेल्या जारावंडी व पेंढरी या दोन्ही पोलीस स्टेशनची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याच्या गोपनिय माहीतीच्या आधारे जारावंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कूरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाचे जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्यास शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीतील सहभागावरुन एटापल्ली येथील युएपीए ॲक्टसह विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा हा २६ जुन २००० ला पर्लकोटा दलममध्ये सदस्य या पदावर भरती झाला २००२ ला एरिया कमिटी सदस्य २००३ मध्ये विभागिय समिती सदस्य पदावर पदोन्नती होऊन २०१४ पर्यंत माड डिव्हीजनमध्ये कार्यरत होता. दिनांक २६ नोव्हेंबर २०१६ ला पुन्हा डीव्हीसीएम (सप्लाय टीम ) पदावर पदोन्नती होऊन या पदावर आजपर्यंत काम केले.
२००९ मध्ये पुंगड, बालेवाडा,बाशिंग, २०१० मध्ये गरपा,२०११ मध्ये कोल्हार (सर्व छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग. २०२० च्या मे महिन्यात पोयारकोठी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. यात गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस अंमलदार शहिद झाले होते. यावर्षी हिक्केर जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.२०१० मध्ये मौजा कोंगाल जि. नारायणपूर (छ. ग.) येथील एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता असे पोलिसांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा याच्या अटकेवर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.गडचिरोली पोलीस दलाने जानेवारी २२ ते आतापर्यंत एकुण ७१ माओवाद्यांना अटक केली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!