आपला जिल्हाक्राईम स्टोरी

विलय सप्ताहाच्या पार्श्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

माओवाद्यांनी पूरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य केले हस्तगत.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २४ सप्टेंबर 

२२ ते २८ सप्टेंबर दरम्यान माओवाद्यांच्या विलय सप्ताहाच्या पार्श्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने घातपाताचा डाव उधळुन लावण्यात यश मिळवले. नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असताना ११.८ किलो हाय एक्स्प्लोझीव्ह शोधून काढले आणि ते नष्ट केले.

शनिवारी ११:४५ वा. चे दरम्यान कुरखेडा उपविभागांतर्गत येत असलेल्या बेडगाव पोमकें हद्दीमध्ये बेडगाव घाट जंगल परिसरात पोस्टे पुराडा पोलीस पार्टीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना कोरची व टिपागड दलमच्या माओवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे पुराडा पोलीस पथकासोबत असलेले डिएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असतांना, एक संशयित जागा आढळून आल्याने गडचिरोली येथुन बीडीडीएस पथक घटनेच्या ठिकाणी बोलावून घेतले व त्यांचे सहाय्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिड ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले पांढ­या मळकट रंगाचे ४ पाऊच आढळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये ११.८किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा पुढील तपास उपनिरीक्षक लक्ष्मण अक्कमवाड करीत आहेत.

सदर कारवाई कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, साहिल झरकर यांच्या नेतृत्वात पोस्टे पुराडाचे प्रभारी अधिकारी भूषण पवार व जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जवानांचे कौतुक केले असून नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!