आपला जिल्हा

गडचिरोली पोलीसांनी शोधून आणले ४१ लाखांचे २८५ हरवलेले मोबाईल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १८ सप्टेंबर 

गडचिरोली येथील सायबर पोलीस स्टेशन मार्फत २०२२ या वर्षात हरविलेल्या व चोरीस गेलेल्या एकुण १५० मोबाईल ज्यांची किंमत जवळपास २२ लाख रुपये आहे. तर २०२३ मध्ये एकुण १३५ मोबाईलचे शोध घेण्यात आले असुन त्यांची अंदाजे किंमत एकुण १८ लाख ८० हजार ९७५ रुपये असे एकूण २८५ मोबाईल ज्याची किंमत ४० लाख ८० हजार ९७५ रुपये आहे. एवढ्या किंमतीच्या मोबाईलचा शोध सायबर पोलीस स्टेशन मार्फत घेण्यात पोलिसांनी यश मिळवले असून त्यापैकी सोमवार १८ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते ७६ मोबाईल संबधीत व्यक्तींना देण्यात आले आहेत.

तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा सतत शोध घेतला जातो. मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईल व्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्यामुळे हरविले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेण्याची कारवाई करण्यात आली. असे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उल्हास भुसारी,पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ पोलीस अंमलदार श्रीनीवास संगोजी, वर्षा वहिरवार, संगणी दुर्गे, गायत्री नैताम, किरण रोहणकर, योगेश खोब्राोगडे, सचिन नैताम यांनी पार पाडली.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!