जिमलगट्टा पोलीसांनी केली वाहनासह पंचवीस लाख रुपयांची दारू जप्त
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १६ सप्टेंबर
गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील पोलीसांनी एका अशोक लेलॅंड कंपनीच्या दहा चाकी वाहनासह पंचवीस लाख रुपयांची दारू जप्त करण्याची कारवाई केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांचे सुचनेवरुन जिमलगट्टा उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संगमेश्र्वर बिरादार व पोलीस स्टाफ यांनी सापळा रचुन कैलास मडावी रा. लखनगुड्डा यास पकडुन त्याचे ताब्यातुन अशोक लेलँड कंपनीचे दहा चाकी माल वाहतुक वाहन क्र. एम. एच. ४० ज्ञसी. डी.५३३० किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये व रॉकेट कंपनीची संत्रा देशी दारुचे २७० बॉक्स ज्याची अंदाजे किंमत दहा लाख रुपये चा असा एकुण अक्षरी पंचवीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपीवर उप पोस्टे जिमलगट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संगमेश्वर बिराजदार हे करत आहेत.
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत आदेश दिले आहेत.
ही कारवाई सुजितकुमार क्षिरसागर यांचे नेतृत्वात जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरादार, महीला पोलीस उपनिरीक्षक पुजा गव्हाणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक आनंद गिरे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.