आपला जिल्हाक्राईम स्टोरी

मुरुमगाव पोलिसांकडून एकवीस लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद

१३८ किलो गांजा जप्त केला

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.११ सप्टेंबर 

मुरुमगाव पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर सापळा रचून कारवाई करीत २१ लाखांच्या मुद्देमालासह १३८ किलो गांजा जप्त करीत तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश संपादन केले आहे.

मुरुमगाव पोलीस मदत केंद्राला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार ३ अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-०४-सीएम-२५१५ मध्ये गांजा घेऊन छत्तीसगड राज्यातुन सावरगाव-मुरुमगाव मार्गे गडचिरोलीकडे येत आहेत. त्यावरुन मुरमगाव ता.धानोरा, जि गडचिरोली येथील कटेझरी जाणारा रोड समोरील बस स्थानकासमोर सापळा लावुन सदर कारला हात दाखवुन थांबवुन तपासणी केली असता कारमध्ये ३ पोत्यांमध्ये एकुण १३८ किलो ५८० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. ज्याची अंदाजे किंमत तेरा लक्ष पंच्यांशी हजार आठशे रुपये आहे . यासह गुन्हयात वापरलेली होंडा सीटी कार क्र. एमएच-०४-सीएम-२५१५ किंमत सात लक्ष रुपये तसेच दोन आरोपीकडे मिळालेल्या मोबाईलची किंमत तेरा हजार रुपये असे एकुण किंमत वीस लक्ष अठ्ठयान्नव हजार आठशे रुपयांचा पोलीसांनी जप्त कला आहे.

सदर गुन्ह्यात आरोपी उमर फैय्याज अहमद शेख, वय २८ वर्ष, व्यवसाय – वाहन चालक, रा.कमला रमननगर बेंगनवाडी जवळ रजा चौक गोपाल इलेक्ट्रीशियनन गोवंडी मुंबई-४३, राकेश राजु वरपेटी वय-२६वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा. सिघ्दार्थ रहिवासी सेवासंघ, टाटानगर, शिवाजीनगर एसओ मुबंई-४३ आणि शहबाज सरवर खान, वय-२७ वर्ष, व्यवसाय-वाहन चालक, रा. आचार्य कॉलेज सुभाषनगर चेंबुर मुंबई-७१ यांना अटक करून त्यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २३ ते आतापर्यंत एकुण ४१६ किलो ३५९ग्रॅम अंदाजे ५१९१४८० रु. किंमतीचा गांजा जप्त करण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोमके मुरुमगावचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सिरसाट हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस मदत केंद्र मुरुमगाव अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सिरसाट यांचे नेतृत्वात परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी, हवालदार नानाजी पित्तुलवार, अंमलदार दिलीप लंबुवार, तराचंद मोहुर्ले, पोअम-वाल्मीक कोटांगले, विनेश मांढरे, नितीन मडावी, हवालदार वैजीनाथ मदने, अंमलदार दिलीप काळे,दिपक जाधव तसेच सीआरपीएफ-११३ बटा. चे पो.नि. मोहनसिंग व त्यांचे सोबत इतर कर्मचारी यांनी पार पाडली.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!