आपला जिल्हा

इंजेवारी ग्रामपंचायतीचे सरपंचासह चार सदस्य अपात्र

शासकीय जागेवर अतिक्रमण करणे पडले महागात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ ऑक्टोबर 

आरमोरी तालुक्यातील इंजेवारी ग्रामपंचायतच्या सरपंच योगाजी कुकडकर, सदस्य सविता दाणे,अर्चना  कुमरे व चुडाराम  पात्रीकर या चार सदस्यांचे, शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याचे पुरावे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी संजय मीना यांनी चारही सदस्यांना अपात्र केले आहे.

इंजेवारी ग्रा.प.चे माजी सरपंच अतुल आकरे यांनी, ग्रामपंचायतच्या या चारही सदस्यांचे शासकीय जागेवर अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे १० ऑक्टोबर २०२१ रोजी अपील दाखल केली होती. त्याअनुषंगाने गैरअर्जदार अल्का कुकडकर व त्यांचे कुटुंबियांचे राहते घराचे मालमत्ता क्र. ०६ क्षेत्र ११८४ चौ. फुट असुन त्यांचेकडील असलेली महाराष्ट्र शासन अनुसूची “क” मध्ये त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२६.६९ चौ. मी. आहे. सदर प्रकरणात प्राप्त झालेले स्वयंस्पष्ट अहवाल व पुराव्यावरुन अल्का योगाजी कुकुडकर यांनी  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका अंतर्गत माहे डिसेंबर २०२० मध्ये ग्रामपंचायत इंजेवारी येथे सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरताना अतिक्रमण नोंद असलेल्या मालमत्तांचा उल्लेख केल्याचे आढळून आले. म्हणजेच त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना अतिक्रमण सोडलेले नव्हते. हे त्यांचे नामनिर्देशन पत्रासोबतचे उमेदवारांनी द्यावयाचे शपथपत्रामध्ये आणि सदस्य पदावर निवडून आल्यानंतर सुद्धा ही बाब प्रथमदर्शनी पुराव्यावरुन अतिक्रमण होते हे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात त्यांना अपात्र ठरविले आहे.

ग्रा.प.सदस्या सविता दाणे यांचे पती कुसन दाणे यांनी ग्रामपंचायतचा मासिक ठरावामध्ये अतिक्रमण केलेली मालमत्ता सोडत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे अतिक्रमण निवडून आल्यानंतर सुद्धा होते हे सिद्ध होते. अर्चना डाकराम कुमरे व चुडाराम पात्रिकर यांनी स्वतःचे नाव मौजा इंजेवारी येथे खाली जागेवर अतिक्रमण केल्याची नोंद होती चुडाराम पात्रिकर हे निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रापंमधील अतिक्रमण सोडत असल्याचे ठराव घेतले. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून आल्यानंतर सुद्धा सदर ठरावामुळे चुडाराम पत्रिकर यांचे अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या दोघांवरही सुध्दा अपात्रतेची कारवाई करण्यात आली.
ग्रामपंचायत इंजेवारीचे चारही सदस्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३ चे कलम १४ (१) (ज-३) चा भंग केल्याचे सिध्द होत असल्याने त्यांना ग्रामपंचायत इंजेवारी चे सदस्य म्हणुन चालु राहण्यास अनर्ह ठरविण्यात येत आहे तसेच ग्रामपंचायत इंजेवारी मधील पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!