आपला जिल्हाराजकीय

राहुल गांधीं पंतप्रधान व्हावेत यासाठी कांग्रेस एकजुटीने काम करणार – निरीक्षक डॉ.नितीन राऊत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १८ ऑगस्ट 

सत्ताधारी पक्षाकडून राहुल गांधीवर दररोज टीका आणि अनर्गल आरोप होत आहेत. त्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे. परंतु जेवढा त्रास तेवढे ते झळाळून उठत काम करीत आहेत. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी पंतप्रधान म्हणून देशाला बघायला मिळणार आहेत. यासाठी कांग्रेसच्या सर्व स्तरातील कार्यकर्ते एकजुटीने काम करणार आहेत असे प्रतिपादन गडचिरोली – चिमुर लोकसभेचे कांग्रेसचे निरीक्षक डॉ.नितीन राऊत यांनी केले.

ते गडचिरोली येथे लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीसाठी आले होते. आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गडचिरोली – चिमुर लोकसभेचे वातावरण कांग्रेस साठी अत्यंत अनुकूल आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज सक्रिय आहे. जिल्हास्तरापासुन ते बुथ स्तरापर्यंत रचना झाली आहे. कांग्रेस मध्ये कुठेही दुफळी नाही. प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते हे दोघेही लगतच्या जिल्ह्यातील असुन संपूर्ण ताकदीनिशी ते विदर्भातील लोकसभा लढवणार आहेत. उमेदवार कोण हा प्रश्न निवडणूकीची घोषणा झाल्यानंतरचा आहे. योग्य वेळी तो घोषीत होईल. गडचिरोलीचे विद्यमान खासदार विकासात पूर्णपणे असफल झाले असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी यावेळी केला. सुरजागडच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे मोठे नुकसान होत असुन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कांग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाभर आंदोलन करावीत असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी आमदार अविनाश वारजूरकर, डॉ.नामदेव ऊसेंडी, आनंद गेडाम, पेंटा रामा तलांडी,कांग्रेसचे प्रदेश चिटणीस डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

बीआरएस चे महाराष्ट्रात आगमन हे सत्ताधाऱ्यांचा, विरोधीपक्ष कमकुवत करण्याचा डाव
महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीचे आगमन मागिल वर्षभरात झाले आहे. बीआरएस ला महाराष्ट्रात आणून विरोधी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षातीलही नाराजांना घेऊन विरोधी पक्षातील मतांची विभागणी कशी करता येईल असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे, भाजपचे नाव न घेता नितीन राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते म्हणाले की बीआरएस ला आता तेलंगणातच गळती लागली आहे. त्यामुळे त्यांनी पहिले स्वतःचे राज्य सांभाळावे. महाराष्ट्रात ते अजून गणतीत नाहीत.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!