आपला जिल्हाविशेष वृतान्त

गोंडवाना विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय अध्यासनाचा वाद चिघळला

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि.१८ ऑगस्ट 

गोंडवाना विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि जनसंघाचे अध्यक्ष राहिलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची कडव्या हिंदुत्ववादाची विचारधारा असलेली “एकात्म मानववाद” संकल्पना राबविण्यासाठी विद्यापिठात “पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन” निर्माण केले असून १९ आगष्ट ला त्याचे विद्यापिठात उद्घाटन आयोजित केले आहे. या अध्यासनाचे निर्माण करून आदिवासींचे जबरीने वनवासीकरन करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा गोंडवाना विद्यापिठात शिकविण्याचा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी घाट घातला आहे. सत्ताधारी मंडळीना खुश करण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे संघाची विचारधारा या गोंडवाना विद्यापिठात लादू पाहत आहेत. आदिवासी विकास युवा परिषद त्यांचा हा कु-हेतू हाणून पडण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळे गोंडवाना विध्यापिठात सुरु होणारे “पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन” तत्काळ प्रभावाने रद्द करावे. दिनांक १९ आगष्ट चा या अध्यासनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केल्याचे वर्तमानपत्रातून जाहीर करावे. अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्यात येईल. असे म्हटले आहे.

तर ‘पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद या अध्यासनाचा होऊ घातलेला ऊद्घाटन समारंभ रद्द करण्यात येऊ नये, अशी विनंतीवजा मागणी व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्य तसेच अभाविप आणि गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना निवेदन देऊन चर्चा केली.
विद्यापीठाच्या अधिसभेत संपूर्ण बहुमताने, किंबहुना एकमताने ‘पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद’ या अध्यासनाचा ठराव मंजूर झाला. त्यास मान्यता मिळाली आणि निधीची तरतूदही झाली. आता या अध्यासनाचा उद्घाटन सोहळा १९ ऑगस्ट रोजी होऊ घातला आहे. मात्र, काही बाहेरच्या संघटना या अध्यासनाचा आणि त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचा विरोध करीत आहेत. त्यासाठी रस्त्यावर आंदोलन केले जात आहे. अधिसभेत एकमताने मंजूर आणि सर्व नियमांतून पारित झालेल्या ठरावाला त्याच्या उद्घाटनाला विरोध केला जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे, असे म्हटले आहे.

त्यामुळे अध्यासनाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आज काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रम स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून निमंत्रण पत्रिकेशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.
विद्यापीठात अध्यासनाचे उद्घाटन ठरल्याप्रमाणेच होणार
‘पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद’ या अध्यासनाचा उद्घाटन कार्यक्रम शनिवार, १९ ऑगस्ट रोजी होऊ घातला असताना, या अध्यासनाच्या विरोधात व समर्थनात काही निवेदने गोंडवाना विद्यापीठाला प्राप्त झालीत. त्यावर व्यवस्थापन परिषदेच्या १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजित बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती, पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद’ या अध्यासनाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे १९ ऑगस्ट रोजी होईल, असा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
सर्व विचारांचे स्वागत करणे आणि सिनेटमध्ये पारित विषयाची अमलबजावणी करणे विद्यापीठ प्रशासनाचे कर्तव्य असल्याने हे अध्यासन व त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, त्याचवेळी विद्यापीठाच्या सिनेटमध्ये पारित अन्य सर्वच अध्यासनांची अंमलबजावणी करण्याचे कामही विद्यापीठ करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र मंजूर झाले आहे. त्याचे उद्घाटनही थाटात पार पडले जगद्गुरू तुकाराम महाराज अध्यासन, क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी संस्कृती अध्यासन, म. ज्योतिबा फुले अध्यासन, सत तुकाराम महाराज अध्यासन, महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन आदी विविध अध्यासनांच्या अंमलबजावणीचे काम सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कटीबध्द आहे.
डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!