आपला जिल्हाक्राईम स्टोरी

गडचिरोली पोलीस दलाने २ संशयीतांकडुन २७ लाख ६२ हजार रुपये केले जप्त

नक्षलवाद्यांचे पैसे असल्याचा पोलिसांचा संशय; २ हजारांच्या नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न , दोघांना अटक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.५ जुलै 

नक्षलवाद्यांनी २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि काही नोटा या खंडणी वसूल केलेल्या असल्याच्या संशयावरून विशेष अभियान पथकांच्या जवानांची अहेरी येथे नाकाबंदी लागली असताना २ संशयीत इसमांची थांबवून चौकशी करताना त्यांचे कडुन २७ लाख ६२ हजार रुपयाचे बेकायदेशीर रक्कम आढळून आली.

भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर २ हजार रु. च्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिक सध्या २ हजार रु. च्या नोटा बँकेतून बदलून घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर माओवाद्यांनी बेकायदेशीर रित्या जमवलेले पैसे लोकांच्या माध्यमातुन वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलवुन घेत आहेत. ब-याच ठिकाणी माओवाद्यांच्या या रक्कमा जप्त केल्या गेल्या आहेत.

बुधवारी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकांच्या जवानांची अहेरी येथे नाकाबंदी लागली असताना २ संशयीत इसमांची थांबवून चौकशी केली असता त्यांचे कडुन २७ लाख ६२ हजार रुपयाचे बेकायदेशीर रक्कम आढळून आली.  रोहीत मंगु कोरसा, वय २४ वर्ष, रा. धोड्डुर ता. एटापल्ली जि. गडचिरोली, आणि नामे बिप्लव गितीश सिकदार, वय २४ वर्ष, रा. पानावर जि. कांकेर (छ. ग.) हे दोघे मोटार सायकलने जात असतांना नाकाबंदी दरम्यान विचारपुस केली असता त्यांच्याजवळ २ हजार रुपयांच्या ६०७ नोटा एकूण रक्कम १२लाख १४,००० हजार आणि ५०० रुपयांच्या ३०७२ नोटा ,एकूण रक्कम १५ लक्ष ३६ हजार २०० रुपयांच्या ७ नोटा एकुण रक्कम १४०० व १०० रुपयांच्या १०६ नोटा एकूण रक्कम १०हजार ६०० असे मिळुन २७ सत्ताविस लाख बासष्ट हजार रुपयेत्यांच्या जवळ आढळले. एवढ्या मोठ्या रक्कमेबाबत विचारपुस केली असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. अधिक विचारपुस केली असता माहिती मिळाली की, ही रक्कम भारत सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेची असुन त्यातील २ हजार रुपयाच्या नोटा बदलविण्यासाठी दिल्या गेलेल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही इसमांवर युएपीए एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!