कांग्रेसचा महायज्ञ संपन्न होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भामरागड तालुक्यातील कवंडे येथे प्रकटले
नियोजन बैठकीसह विविध कार्यक्रमांना उपस्थिती काँग्रेसच्या महायज्ञ आंदोलनाचा परिणाम

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि. ६ जून
शुक्रवारी सकाळी ११ ते २२ च्या दरम्यान गडचिरोली शहरातील सेमाना देवस्थानात दर्शन दे गा दे गा देवा भाऊ नामक काँग्रेसचे महायज्ञ आंदोलन झाले. तोच १२ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे भामरागड तालुक्यातील कवंडे या नुकत्याच निर्माण झालेल्या पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. आणि काँग्रेसच्या अपेक्षेप्रमाणे तेथील जवानांशी संवाद साधला, अत्याधुनिक शस्त्रे आणि बुलेटप्रुफ जॅकेट्सचे वितरण केले. नंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहात १२ आत्मसमर्पित जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.
उल्लेखनीय आहे की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर १ जानेवारी २५ रोजी गडचिरोलीत आले होते. त्यानंतर कालपर्यंत त्यांचे पाय गडचिरोलीत पडले नव्हते. दरम्यानच्या काळात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने सातत्याने जिल्ह्यातील समस्यांना घेऊन सरकारला घेरले, तरीही फडणवीस यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही हे बघून महायज्ञ रुपी आंदोलन घोषित केले. या आंदोलनाच्या भूमिकेला प्रतिसाद मिळाला आणि मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा प्रश्नांकित झाली. परिणामी त्यांंनी शुक्रवारी आयोजित काँग्रेसच्या महायज्ञाच्या दिवशीच नेम साधत गडचिरोलीत येऊन विविध कार्यक्रमांत उपस्थिती दर्शवली.
सायंकाळी जिल्हा नियोजन भवनात झालेल्या आढावा सभेत कांग्रेसने केलेल्या मागण्यांपैकी अनेकांवर विस्तृत चर्चा झाली, त्यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली व सहपालकमंत्र्यांना यासंदर्भात ठोस पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकास कामात झारीतील शुक्राचार्य बनू नये असे बजावले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सहपालकमंत्री यांना जिल्हा विकासासाठी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिल्याचेही सांगितले.