आपला जिल्हा

रानटी हत्तींनी घेतला पुन्हा एक बळी, पिकाचे संरक्षण बेतले जीवावर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ नोव्हेंबर 

धान पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी रानटी हत्तींना जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. बाजूला दबा धरून बसलेल्या हत्तीने रस्त्यावर शेतकऱ्यास चिरडून ठार केले. ही घटना तालुक्यातील मरेगावजवळ २५ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता घडली. मनोज प्रभाकर येरमे (३८) रा. मरेगाव असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

चांभार्डा व मरेगाव परिसरात गेल्या १० दिवसांपासून रानटी हत्तींचा धुडगूस सुरू आहे. यातच आपल्या पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी मनोज येरमे हे शनिवारी सायंकाळी अन्य शेतकऱ्यांसह शेताकडे गेले होते. दरम्यान वडधा-मौशिखांब मार्गालगतच रानटी हत्तींचा कळप वावरत होता. याच वेळी येरमे हे सायकलने घराकडे परत येत असतानाच हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला व डांबरी रस्त्यावरच त्यांना चिरडले. यात येरमे यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. चांभार्डा व मरेगाव भागात हत्तींनी गेल्या आठवडाभरापासून अक्षरश: धुडगूस घातला असून शेकडो शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!