लॉयडस मेटल्स कंपनीच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारणार
आष्टी येथील काँग्रेसच्या बैठकीत निर्णय

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २८ मे
सुरजागड येथील लॉयडस मेटल्स कंपनीच्या लोहदगडाच्या खदानीत चालणाऱ्या अनियंत्रित वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झालेली असून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे परिणामी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्कांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे वतीने लॉयडस मेटल्स कंपनीच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचा निर्णय रविवारी आष्टी येथे झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस ने घेतला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
सुरजागड येथील लॉयडस मेटल्स कंपनीच्या लोहदगडाच्या खदानीत चालणाऱ्या अनियंत्रित वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसेंदिवस अपघातांचे व मृत्यूचे सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. आष्टी आलापल्ली सिरोंचा महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरजागड खदानीची वाहतूक बंद करण्यात यावी याकरिता जिल्हा काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी मोर्चे, आंदोलन व निवेदन देऊन मागणी केली. मात्र प्रशासन आणि सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे डोळेझाकपणा केला. परिणामी अनेक लोकांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कंपनीविरुद्ध असंतोष निर्माण झाला असून जनतेच्या हक्कासाठी आता काँग्रेस पूर्णपणे रस्त्यावर उतरणार असून आगामी काळात लायड्स मेटल्स कंपनी व सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठे जनआंदोलन उभारण्याच्या संदर्भात आष्टी येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक संपन्न झाली.
बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर नितीन कोडवते, सचिव डॉक्टर चंदा कोडवते, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, अहेरी तालुका अध्यक्ष डॉ. पप्पू हकीम, मूलचेरा तालुकाध्यक्ष प्रमोद गोटेवार, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, बंगाली सेल अध्यक्ष बीजन सरदार, जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, रमेश कोडापे, पंकज पस्कुलवार, के पी मंडल, डी जे सरदार, सेमल दास, आनंद कांबळे, आय एस हलदर, रमेश मंडल, प्रेमानंद गोंगले, विश्वास बोमकंटीवार, हेमंत कुंबरे, शामराव वनकर, देवेंद्र भोयर, योगेंद्र जंजाळ, अनंत मुजुमदार, विनोद येलमुळे, दिवाकर कोहळे, धनराज वासेकर, दिलीप बनकर, कालिदास बुरांडे, प्रकाश ब्राह्मण, मधुकर सडमेक, रज्जाक पठाण, राघोबा गोरकर, मोहम्मद शेख, नामदेव आत्राम, रसिक बूमावार, विलास शेंडे, चंदू बोरीले, दानिश हकीम, गणेश उपलवार, त्यांचे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.