आपला जिल्हा

वनजमिनीच्या अवैध विक्रीप्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित

दोषींवर कारवाईत हायगय केल्याचा ठपका

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२१ फेब्रुवारी 

शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या कोट्यवधीच्या वनजमिनीवर लेआऊट तयार करून भूखंड विक्री केल्याच्या प्रकरणात भूमाफियांवर कारवाई करताना हयगय केल्यामुळे गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांना निलंबित करण्यात आले आहे. सदर प्रकरण माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोलीच्या आयटीआय ते गोकुळनगर बायपास मार्गावर असलेल्या सर्वे क्रमांक २१ मधील १.२९ हेक्टर वनजमिनीवर भूमाफियांना अतिक्रमण केले होते. काही दिवसांनी त्यावर प्लॉट पाडण्यात आले व काही भूखंडाची विक्री देखील केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी आरोपींवर गुन्हे दाखल करून थातुरमातूर कारवाई केली. मात्र, पुढील कारवाई करताना ८ ते १० महिने चालढकल केली. या दरम्यान भूमाफियांनी अनेकांना भूखंडाची विक्री केली. माध्यमांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर वनविभागाला जाग आली व त्यांनी ती जमीन अतिक्रमण मुक्त करून ताब्यात घेतली गेली.

 

आरोपींमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा विधी सल्लागार !
शहराच्या मध्यभागी असलेल्या या जमिनीचा दर १० कोटींच्या घरात आहे. त्यामुळेच माफियांचा त्यावर डोळा होता. विशेष म्हणजे आरोपींमध्ये मनीष सुरेश कन्नमवार, रूपेश देवीदास सोनटक्के, डोमळे बंधु यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी हरीश रेवनाथ बांबोळे (रा. नवेगाव) यांचे नाव आहे. महसूलच्या मुख्य कार्यालयातच अधिकारी असे नियमबाह्य काम करीत असतील तर ते जिल्हाधिकारी कार्यालयात किती गौडबंगाल सुरू असेल हा संशोधनाचा विषय आहे. उल्लेखनीय आहे की संजय मीना यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालय हे अवैध धंद्यांचे माहेरघर म्हणून चर्चेत आहे.

या प्रकरणी आर एफ ओ अरविंद पेंदाम हे आरोपींची नावे जाहीर करण्यासही टाळाटाळ करीत होते. याप्रकरणातील त्यांचा चौकशी अहवालही संशयास्पद आहे. योग्य तपास करण्यात आला नाही, असा ठपका पेंदाम यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी चौकशीअंती पेंदाम यांना निलंबित केले. या कारवाईबाबत उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दुजोरा दिला आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!