सुडाचे राजकारण संपवण्यासाठीच शिवगर्जना अभियान : माजी खासदार चंद्रकांत खैरे
चामोर्शीतून शिवगर्जना अभियानाचा शुभारंभ

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२७ फेब्रुवारी
पैशांच्या बळावर भारतीय जनता पक्ष देशभरातील प्रादेशिक पक्ष संपविण्यासाठी सुडाचे राजकारण करीत आहे. शिवसेना फोडण्याचे कारस्थान केले. महाराष्ट्र बुडविण्याचे राजकारण सुरू आहे. इतर प्रादेशिक पक्षांच्या मागे इडी, सीबीआय, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर भाजपा करीत आहे. तर दुसरीकडे कोट्यावधींची आमिषं दाखवून प्रादेशिक पक्षांमधील लोकप्रतिनिधी,नेते फोडण्याचे काम सुरू आहे. भाजपचे हे सुडाचे राजकारण संपवण्यासाठीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवगर्जना अभियान सुरू केले असून सर्व विरोधी पक्षाची मोट बांधत आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गडचिरोलीत केले. ते शिवगर्जना अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असताना गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की निवडणूक आयोगाने केंद्राच्या दबावात येऊन काम केले. परंतु त्यामुळे शिवसेना संपणार नाही. भाजप ईव्हीएम च्या जोरावर निवडणुका जिंकत आहे. त्यामुळे शिवसेनेचा ईव्हीएम ला विरोध आहे. यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपर वर व्हाव्या अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली असून सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होऊन ही मागणी लावून धरावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवसेना सुरजागड विरोधात उग्र आंदोलन करणार
युवा सेनेचे सहविस्तार प्रमुख शरद कोळी हे नेतृत्व करणार
वस्तूतः सुरजागड लोहप्रकल्पाची निर्मितीच ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या त्यांच्या स्वाक्षरीने झाली यावेळी जिल्ह्यातील आपल्या बेरोजगारांना जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी हा प्रकल्प उभा करण्यात आला मात्र यातून अपेक्षित उद्देश साध्य होताना दिसत नसून भांडवलदारांचे हित जोपासण्याचे स्थानिकांवर अन्याय करण्याचे कंपनीचे धोरण दिसून येत असल्यामुळे शिवसेना स्थानिकांना न्याय देण्यासाठी आणि हा उद्योग स्थानिक ठिकाणीच व्हावा यासाठी उग्र आंदोलन करणार असून युवा सेनेचे सहविस्तार प्रमुख तथा धाडस या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी हे गडचिरोली येऊन या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. लॉयड्स मेटल्स च्या सुरजागड लोह खाणीतील अवैध वाहतूक, उत्खनन व पर्यावरणीय परिणाम आणि वाढत्या प्रदूषणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून स्थानिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोळी यांनी सांगितले .