विशेष वृतान्त

ठेवीदारांचे लाखो रुपये घेऊन पतसंस्थेचा एजंट फरार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२१ फेब्रुवारी 

गडचिरोली शहरातील विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक तथा दैनिक ठेव वसुली एजंट मंगेश नरड हा संस्थेच्या खातेदाराचे लाखो रुपये घेऊन फरार झाला आहे. या संदर्भात लखन शालिकराम पडीहार या नवेगाव येथील खातेदाराने, त्यांच्या घरातील चार खातेदार व नवेगाव येथील आणखी काही खातेदार यांचे ३३ लाख १८हजार १९० रुपये घेऊन ६ फेब्रुवारीपासून फरार झाला असून, ९ फेब्रुवारी रोजी तक्रार केल्यानंतरही गडचिरोली गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली. शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रार केल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेला फसवणूक झालेले पिडीत खातेदार उपस्थित होते.

खातेदारांनी यावेळी सांगितले की विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे एक कार्यालय नवेगाव येथे असुन त्यात मंगेश नरड हा आरडी, दैनिक वसुली तथा फिक्स डिपॉझिट एजंट आणि व्यवस्थापक म्हणून मागिल २०-२२ वर्षांपासून कार्यरत होता. प्रदीर्घ काळ कार्यरत असल्यामुळे त्याच्या गावात बऱ्याच ओळखी झाल्या होत्या. त्यातूनच नवेगाव येथील शेकडो लोकांनी मंगेशच्या मोठ्या व्याजदराच्या आमिषाला बळी पडून आपले लाखो रुपये अनेक वर्षांपासून विजया महिला नागरी पतसंस्थेत गुंतवले आहेत.

यापैकी काही ग्राहकांनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आपल्या रकमा परत मागितल्या असता मंगेशने रक्कम परत देण्यासाठी टाळाटाळ केली व ६ फेब्रुवारी रोजी अचानक गायब झाला. पतसंस्थेच्या अध्यक्षा विजया गद्देवार यांचेशी ग्राहकांनी संपर्क साधला असता त्यांनी खातेदारांकडील कागदपत्रे तपासून त्यांच्या पतसंस्थेच्या रेकॉर्डवर सदर खातेदारांच्या रकमांची कोणतीही नोंद नसल्यामुळे आमची पत संस्था आपले कोणतेही देणे लागत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे आमची विजया महिला नागरी सहकारी पतसंस्था व त्यांच्या एजंट कडून मोठी फसवणूक झाली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी २० फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात कलम ४२० व इतर कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक व एजंट मंगेश नरड यांचेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. उल्लेखनीय आहे की दोन वर्षांपूर्वी सुद्धा या पतसंस्थेत तीन कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. त्याची वसुली अद्यापही सुरू आहे.

एजंट तथा व्यवस्थापकाचा फ्राड
पोलीसांना तपासात सहकार्य करणार
मंगेश नरड याने अनेक दिवसांच्या ओळखीमुळे स्थानिक नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून पतसंस्थेच्या प्रशासनाला अंधारात ठेवून आर्थिक घोटाळा करुन फरार झाला आहे. या प्रकरणी आपण पोलीसांना बयान देउन वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. पोलिसांच्या तपासात संपूर्ण सहकार्य करीत आरोपीला अटक करण्याची तक्रार नोंदवली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.
विजया गद्देवार,
अध्यक्ष विजया महिला नागरी सहकारी पतसंस्था, गडचिरोली.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!