आपला जिल्हा

ढिवर समाजाने विकासासाठी संघर्ष करण्याची गरज : भाई रामदास जराते

शिवणी ( बु ) येथे वाल्मिकी ऋषींच्या जयंती प्रित्यर्थ मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२९ आक्टोंबर 

परंपरागत मासेमारीच्या व्यवसायात गुंतलेला ढिवर – भोई समाज मोठ्या संख्येने असूनही शिक्षणाचा अभाव असल्याने संघटीत नाही. त्यामुळे ढिवर समाजाने एकत्र येवून प्रगतीच्या मुद्यांवर संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

आरमोरी तालुक्यातील मौजा शिवणी (बु.) येथील जय वाल्मिकी ॠषी ढिवर समाज मंडळाच्या वतीने मुर्ती प्रतिष्ठापना व जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भाई रामदास बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या सामाजिक परिस्थिती नुसार समाज उन्नतीसाठी आवश्यक मुद्यांना घेवून संघर्ष केला तरच ढिवर – भोई समाजाच्या अडचणी दूर होवून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय अस्तित्व निर्माण करणे शक्य आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन पुरुषोत्तम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. दुर्वेश भोयर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून जिल्हा मच्छीमार संघाचे सभापती कृष्णाजी मंचार्लावार तर प्रमुख अतिथी म्हणून मोहनजी मदने, सुनील बावणे, डंबाजी भोयर, किशोर बावणे, मिनाक्षी गेडाम, रोहिदास कुमरे, देवेंद्र भोयर, फुलचंद वाघाडे, काॅ. अमोल मारकवार, केशव बारापात्रे, बंदेलवार, शिवणीचे सरपंच पुरुषोत्तम दोनाडकर, सदस्य गौरीताई बुल्ले, प्रभाताई राऊत, पोलीस पाटील शकुंतला पत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजातील युवकांना संधी दिली पाहिजे 
समाजातील युवकांना संधी देवून ढिवर – भोई समाजाची प्रभावी संघटना बांधणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा मच्छीमार संघाचे सभापती कृष्णाजी मंचार्लावार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी डॉ. दुर्वास भोयर, मोहनजी मदने, फुलचंद वाघाडे, मिनाक्षी गेडाम, काॅ.अमोल मारकवार यांनीही समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमा दरम्यान ढिवर – भोई समाज संघटनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भाग्यवान मेश्राम आणि जिल्हा सचिव किशोर बावणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन भाग्यवान मेश्राम यांनी तर प्रास्ताविक बळीराम दर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते लोमेश दुमाणे, सदाशिव मेश्राम, प्रभुजी मेश्राम, जयंद्र कांबळे, शामराव मेश्राम,श्री.सचिन ठाकरे, राजेंद्र कोल्हे, हरिजी मेश्राम, राजू पत्रे, प्रकाशी मेश्राम, रमेश ठाकरे, सुनिल कोल्हे, रवींद्र मेश्राम, रवि कोल्हे, लक्ष्मण भोयर, घनश्याम भोयर,तुकडोजी कोल्हे, हरी मेश्राम, केवळजी मेश्राम, मुरलीधर मेश्राम, सुधीर ठाकरे, मनोज मेश्राम यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!