आपला जिल्हाराजकीय

अधिकाधिक पदवीधरांनी मतदार नोंदणी करून घ्यावी- आमदार अभिजीत वंजारी यांचे आवाहन

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात, पदवीधर मतदार नोंदणी कक्ष स्थापन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ ऑक्टोबर 

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा काँग्रेस कार्यालयात, पदवीधर मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले. आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते पदवीधर मतदार नोंदणी कक्षाचे लोकार्पण करण्यात आले.

पदवीधरांची मतदार नोंदणी करण्याच्या अनुषंगाने व नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने या कक्षाची स्थापना करण्यात आली असून अधिकाधिक पदवीधरांनी मतदार नोंदणी करून घ्यावे असे आवाहन आमदार अभिजीत वंजारी यांनी केले आहे.

यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, सिनेट सदस्य अजय लोंढे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, नंदू वाईलकर, वामनराव सावसाकडे, नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, अब्दुल पंजवानी, दत्तात्र्यय खरवडे, विनोद लेनगुरे, नंदू नरोटे, अनिल कोठारे, मुस्ताक हकीम, रुपेश टिकले, दिवाकर निसार,ढिवरु मेश्राम, चोखाची भांडेकर, धनपाल मिसार, डॉ शशिकांत गेडाम, काशिनाथ भडके, गुरुदेव येनरेंडीवार, समीर ताजने, श्रीनिवास ताडपल्लीवार, योगेंद्र झंजाळ, जितेंद्र मुनघाटे, लालाजी सातपुते, आनंदराव पिपरे, बंडू पोहनकर, अनिल पाल, बंडू भोयर, कालिदास निकुरे, विलास मेश्राम, दीपक भोयर, राजू निकुरे, शालिनीताई पेंदाम, कविता उराडे, रिता गोवर्धन, कल्पना नंदेश्वर, , वाय.जी.बानबले, , कालिदास मोहुर्ले, चारुदत्त पोहाणे, विवेकानंद हुलके, स्वप्निल बेहेरे, मारोती अलोने, सचिन गवतुरे, पुरुषोत्तम चिंचोलकर, संतोष भांडेकर, समीर दिघे सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!