महाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यात वनाधारित उद्योग सुरू करा: शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी

गडचिरोलीच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २९ डिसेंबर 

गडचिरोली हा जंगल व्याप्त जिल्हा असल्याने येथील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी जंगलांचे रक्षण करुन त्यावर आधारित उद्योग शासनाने सुरू करावेत. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली.

आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषावरील २६० नियमान्वये चर्चेदरम्यान आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, पुर्व विदर्भात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र धान खरेदी केंद्रे वेळेत सुरू होत नाही. साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाच्या पैशांनी खरेदी केलेले धान्य सडून कोट्यवधींचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुबलक प्रमाणात धान साठवणूकीसाठी गोदामांचे बांधकाम करण्याची आवश्यकता असून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. जंगलावर आधारित ब्रिकेटींग उद्योग सुरू करण्यासाठीही शासनाने पुढाकार घेण्याची मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली. या अधिवेशनात भाई जयंत पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडले. त्यात मेडीगट्टा बॅरेज मुळे बाधित झालेल्यांना नुकसान भरपाई, पूनर्वसन यासह पेसाची योग्य अंमलबजावणी करुन आदिवासींच्या हक्कांचे आणि ग्रामसभांच्या अधिकारांचे संरक्षण करणे, सुरजागड खाणिची लीज देताना स्थानिक ग्रामसभांचे अधिकार डावलणे, रोजगार निर्मितीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक करणे, यासह अनेक अनियमितता आढळून आल्या त्यावरही त्यांनी सभागृह हालवून सोडले.

मुख्यमंत्र्यांकडून मात्र सुरजागड प्रकरणी थातुरमातुर उत्तर देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न झाला. हे दु:खद असल्याची गडचिरोलीत चर्चा सुरू आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!