आपला जिल्हाताज्या घडामोडी

इमारतीचे बांधकाम कोसळल्याने दोन मजूर जखमी

शहरातील लाजरी साडी सेंटर चे विस्तारीत बांधकाम आहे सुरू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ३० डिसेंबर 

गडचिरोली शहरातील बाजारपेठ परिसरात असलेल्या लाजरी साडी सेंटरचे भव्य विस्तारीत बांधकाम गेले कित्येक दिवस सुरू आहे. शुक्रवारी इमारतीच्या पोर्चचा स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना  लिफ्ट व्हायब्रेट होऊन कोसळली व  सेंट्रींग आणि स्लॅबचा काही भाग कोसळला. या अपघातात दोन मजूर जखमी झाले असून त्यांचेवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेमंत केशव गेडाम व लक्ष्मण नानाजी जेंगठे अशी जखमी मजूरांची नावे आहेत. अपघात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झाला असल्याची माहिती आहे.

लाजरी साडी सेंटरच्या मालकीच्या असलेल्या बाजूच्या जागेवर मागील काही दिवसांपासून भव्य इमारतीचे बांधकाम सुरु आहे. आज दिवसभर इमारतीच्या पोर्चचा स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. त्यासाठी लोखंडी पाईप आणि लाकडांची सेंट्रींग वापरण्यात आली होती. संध्याकाळी मजूर इमारतीवरुन खाली उतरत असताना अचानक सेंट्रींग आणि स्लॅबचा काही भाग कोसळला. लागलीच दोन मजूरही खाली कोसळले. त्यातील एक मजूर रेती-सिमेंटच्या मलब्याखाली दबला, तर दुसरा बाजूला फेकला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेत हेमंत गेडामच्या कमरेला जबर दुखापत झाली आहे, तर लक्ष्मण जेंगठे यालाही प्रचंड मार लागला आहे. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

सदर बांधकामास नगरपरिषदेची परवानगी घेतली आहे किंवा नाही याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच परवानगीनुसारच बांधकाम सुरू आहे किंवा नाही याचाही या अपघाताच्या निमित्ताने तपास करणे आवश्यक आहे. गडचिरोली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक गोरे यांनी अपघातग्रस्त स्थळाला भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!