आपला जिल्हाविशेष वृतान्त

जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाच्या निवडणुकीत आपूलकी पॅनलची प्रचारात आघाडी

संपूर्ण विदर्भातील समाजातील वातावरण ढवळून निघाले आहे. अधिकार मिळावेत यासाठी होतीय जनजागृती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२३ डिसेंबर 

नागपूर येथील जैन कलार समाज सार्वजनिक न्यासाच्या केंद्रीय आणि जिल्हा मंडळासाठी निवडणूकीसाठी २५ डिसेंबर, रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. मागिल १५ दिवसांपासून या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन प्रस्थापित प्रयास पॅनल विरूद्ध बदल घडवून आणण्यासाठी आपूलकी पॅनलने कंबर कसली असून ते संपूर्ण विदर्भात फिरून जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. 

गडचिरोली जिल्हा मंडळाची आधीच अविरोध निवड झाली आहे. जिल्हा मंडळासाठी आवश्यक पदाधिकाऱ्यांसह २५ सदस्यांसाठी केवळ २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्यामुळे सर्वांची अविरोध निवड झाली आहे. निवडणूक अविरोध करुन समाजाचा लाखो रुपयांचा अकारण खर्च वाचवून गडचिरोली जिल्ह्यातील समाज बांधवांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

मध्यवर्ती मंडळासाठी गडचिरोली जिल्हा संचालक पदासाठी आपूलकीचे बंडूभाऊ ऊर्फ विनोद शनिवारे हे मैदानात असून प्रयासचे निवर्तमान संचालक भूषण समर्थ हे पुन्हा एकदा संचालक पदासाठी ऊभे आहेत. दोन्ही पॅनेलचे उमेदवार आपापल्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

आपूलकी पॅनलने गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. बंडू शनिवारे यांच्या प्रचारासाठी गडचिरोली जैन कलार समाजाची महिला आघाडी प्रामुख्याने सरसावली त्या डोअर टू डोअर आणि प्रत्येक गावात जाऊन प्रचार करताना दिसतात. त्यामुळे त्यांना समाजातील सर्वच मतदारांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. मागिल ५ वर्षे ज्यांनी मध्यवर्ती मंडळाचे गडचिरोली जिल्हा संचालक पद भूषविले ते निष्क्रिय ठरल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्यातील समाजबांधवांनी केला असून आजपर्यंत समाजबांधवांना मध्यवर्ती मंडळाच्या निवडणुकांमध्ये साधा मतदानाचा हक्क सुद्धा मिळवून दिला नाही. आपूलकी पॅनल मुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो समाजबांधवांना पहील्यांदाच मतदानाचा हक्क बहाल झाल्यामुळे त्यांचा कल आपुलकी कडे असल्याचे दिसून येत आहे. नागपूर सह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यातील संपूर्ण समाज या निवडणुकीच्या निमित्ताने ढवळून निघाला असुन आपल्या हक्कासाठी जागृत होताना दिसत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आणि वडसा या दोन ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. गडचिरोली मतदान केंद्रावर चामोर्शी, गडचिरोली आणि आरमोरी तालुक्यातील तर वडसा केंद्रावर कोरची, कुरखेडा आणि वडसा तालुक्यातील मतदार मतदान करु शकतील.

आपुलकी पॅनलचे उमेदवार बंडू ऊर्फ विनोद शनिवारे यांच्या प्रचारार्थ रतन शेंडे, पांडुरंग पेशने, अशोक हरडे , प्रदीप रणदिवे, मनोज कवठे, प्रदीप लाड, वैभव भिवापूरे, वासुदेव लाड, वर्षा विनोद शनिवारे, सुरेखा रणदिवे, हेमंत डोर्लीकर, मनोज बनपूरकर, महेश मुरकुटे, अर्चना मानापूरे, वैशाली लाड, विलास गोटेफोडे, रविंद्र गोटेफोडे, प्रकाश समर्थ, वसंत भांडारकर, केवळराम किरणापूरे, पराग दडवे, गौरव नागपूरकर, अश्विन भांडारकर, वसंत फटींग, गुलाब मानापूरे, रुपेश लाड  राजेंद्र घुगरे  आहे. सुधीर शेंडे, किशोर भांडारकर, गणेश हरडे, स्वाती कवठे, लता मुरकुटे, भाग्यश्री शेंडे, अल्केश शनिवारे, धनराज गुरु,  दिलीप दडवे, अर्चना भांडारकर, सरिता पेशने, स्नेहा शेंडे, शारदा हजारे, मनीषा हरडे व जैन कलार  समाज बांधव सहकार्य करीत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!