आपला जिल्हा

सात दिवसात आलापल्ली-आष्टी मार्गाची दुरुस्ती करा

जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २१ ऑगस्ट

गडचिरोली जिल्ह्यात यंदा जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून मागील दीड ते दोन महिन्यांपासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलापल्ली ते आष्टी महामार्गवर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी त्वरीत सदर मार्ग दूरुस्थ करण्यात यावी अन्यथा सात दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरीचे तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हातील अनेक रस्त्यांची दुराव्यस्था झाली आहे. त्यातच आलापली ते आष्टी महामार्गवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने मोटर सायकल, वाहन चालकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. तसेच बाहेर गावावरून आलापली, आष्टी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना शाळेत वेळेवर पोहचता येत नसून जिव मुठीत धरून शिक्षणासाठी बाहेर पडावे लागत आहे व एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखाण्यात नेण्यास अडचण निर्माण झाले असून असे कित्येक घटना पहावयास मिळत आहेत. तरी सदर समस्यांवर त्वरीत लक्ष घालून सदर मार्ग दूरुस्थ करण्यात यावी अन्यथा सात दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व बोरीचे सरपंच शंकर कोडापे, सरपंच वेलादी, नितीन गुंडावार, खमनचेरु सरपंच शायलू मडावी, महागाव, सुरेश गंगादरीवार, सोयल पठाण, पांडुरंग रामटेके, रावी नेलकूद्री, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी तसेच सर्व ग्रा. प. सरपंच उपसरपंच सदस्य गण उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!