आपला जिल्हा

गडचिरोलीत भीसीच्या नावावरून लाखो रुपयांची फसवणूक

४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल, घटनेचा तपास सुरु

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २१ ऑगस्ट

भीसी ह्या प्रकारातून मोठी रक्कम वसुल करुन लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना गडचिरोली येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनू ठाकूर, इकरार ठाकूर, करिश्मा ठाकूर आणि छगन जेंगठे यांनी संगनमत करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.

झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक वेगवेगळ्या गैरमार्गाचा वापर करतात. सोनु ठाकुर, इकरार ठाकुर, करीष्मा ठाकुर व छगन जेंगठे यांनी आपसात संगनमत करुन आपले कडील भीसीत रक्कम जमा केल्यास, रक्कम जमा करणाऱ्यास १.५ टक्के दराने कमिशन मिळेल व दरमहा कमिशन घेतले नाहीतर भीसीच्या मुदतपुर्तीनंतर मोठ्या रकमेचा परतावा देण्यात येईल, असे सांगितले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने सोनु ठाकुर यांचेकडे भीसीची रक्कम जमा केली. परंतु मुदतपुर्तीनंतर ३० लाख रुपये व त्यावरील कमीशन परत न करता आरोपींनी फिर्यादीची फसवणुक केली.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द कलम ४०६, ४२०, ३४ सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम सन १९९९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध तक्रार असलेल्या लोकांनी उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधवा, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!